Blog Archive

Sunday, 31 July 2016

RSS व शिवसेनेच्या शाखेत जात असे आणि मीही गांधीजींची टिंगल उडवत असे - विनोद कावळे

महात्मा गांधी आणि मी !                  
आत्ताच गांधीजीची टींगल करणारी पोष्ट पाहिली....  महात्मा गांधी यांच्या विरोधातील व त्यांची टींगल करणार्या पोष्ट मी जेव्हा दररोज वेगवेगळ्या गृपवर पहातो तेंव्हा मी १४ वर्षे पाठीमागे जातो.    
  त्या वेळी मी मुंबईला होतो. आम्ही रहात होतो तीथेच RSS व शिवसेनेची शाखा होती. त्या ठीकाणी माझे येणे-जाणे असायचे...त्या ठीकाणी मला दररोज गांधीजींवरील जोक ऐकायला मीळायचे व हसायचे  उदा. टकल्याने देशाची वाट लावली वगैरे..त्यात मीही सामील होतो अशा वातावरनामुळे गांधीजीविषयी तीरस्कार निर्माण झाला....
वाचनाची आवड असल्यामुळे मला गांधीजींवरील वेगवेगळी पुस्तके वाचण्यात आली.उदा.गांधीजी व कॉंग्रेस ने अखंड भारत का नाकारला..?,सत्याचे प्रयाेग,इत्यादी...
तसेच गांधीजींवरील फेसबुक पोष्ट...... तेंव्हा गांधींजी थोडेफार समजले व लक्षात आले की आपल्यावर गांधीजीविषयी किती तीरस्कार करण्याचे काम होत होते त्याला आपण सहज बळी पडत होतो.                
नाहीतर जगातील थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन,अमेरिकेचे थोर नेते मार्टिन ल्युथर किंग,आफ्रीकन गांधी नेल्सन मंडेला,तीबेटचे सर्वोच्च धर्मगुरु व लोकशाही मार्गाने चीनसारख्या महासत्तेला टक्कर देणारे दलाई लामा, अमेरिकेचे अध्यक्ष बराक आेबामा,म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने सत्ता स्थापना करणार्या आंग सू की, नोबेल पारितोषीक विजेती व मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी पाकिस्तानातील बालकार्यकर्ती मलाला युसुफजाई अशा अनेक लोकांनी ज्या गांधींना आदर्श मानले त्या गांधींची आपणच टींगल केली नसती..
तसेच कॉंग्रेस चे कट्टर विरोधक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांच्या परदेशातील प्रत्येक भाषणात गांधीजींचा उल्लेख करावा लागतो यातच गांधी विचारांचा विजय आहे...
विनोद कावळे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1755576434691755&id=100007182466178

No comments:

Post a Comment