ताओमधील एक कविता -
७७. ईश्वरीमार्ग
ईश्वरी मार्ग हा शिवधनुष्यासारखा नाही काय
वरचं टोक खाली दाबलं
की खालचं टोक वर उचललं जातं.
ताणलेली प्रत्यंचा मोठी असेल
तर करतो तो ती लहान
आणि जर ती असेल अतीशय लहान तर
करतो तो तिला लांब.
जिथे असते अधिक तिथून कमी करणे
आणि जिथे उणीव असेल तिथे भर घालणे
हाच आहे ईश्वरी मार्ग.
पण माणसाचा मार्ग असतो वेगळा
जिथे उणीव असेल तिथूनच ते काढून घेतात
आणि जिथे असते भरपूर तिथे घालतात अजून भर.
ऋषीला कळत असतं की मालमत्तेला काहीही अर्थ नसतो
अनाम राहून देतो तो जगाला
आणि करतो तो ते जे आवश्यक असतं.
हातचं काहीही राखून न ठेवता
देतो तो आपलं ज्ञान
कोणताही देखावा न करता.
मुक्त अनुवाद - ब्रिजमोहन.
No comments:
Post a Comment