वेळोवेळी गांधीजींच्या बाबतीत अश्लील फोटो ,शिवीगाळ अथवा बदनामी करणाऱ्या खोट्या पोस्ट वाचून ज्यांचा राग अनावर होतो अशा सगळ्या मित्रांसाठी,
डॉ.अभय बंग ह्यांनी कालच एका लेखात म्हटलेलं आहे , “ जेव्हा एखादा प्रश्न पडतो तेव्हा मी गांधी चरित्रात त्याच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो “
गोष्ट कुठेतरी वाचलेली आहे.
गांधीजींना देश परदेशातून हजारो पत्र यायची , काही मार्गदर्शन मागणारी,काही स्तुती करणारी तर काही टीका करणारी.
एका युरोपियन माणसाने इंग्रजीत पत्र पाठवलेल जवळपास तीन पानांचं.प्रचंड शिव्या आणि अश्लाघ्य भाषेचा नमुना असलेल पत्र.
गांधीजींचे सहायक बरीचशी पत्र पाहून त्याची वर्गवारी करून गांधीजींना द्यायचे.
हे पत्र अतिशय घाणेरड होत पण त्यावर गांधीजी काहीतरी खरमरीत उत्तर देतील किंवा द्याव ह्या अपेक्षेने सहायकाने पत्र गांधीजींच्या हातात दिल आणि अपेक्षेने वाट पाहू लागला.
गांधीजीनी पत्र वाचल, चेहऱ्यावर स्मितहास्य तसच होत ,त्यांनी त्याची टाचणी काढून बाजूला एका लहानश्या खोक्यात ठेवली आणि कागद पुन्हा सहायकाला दिले.
न राहवून सहायकाने प्रतिक्रिया विचारली.
गांधीजी शांतपणे टाचणीकडे बोट दाखवून म्हणाले , “ हि टाचणी सोडली तर त्यात उपयुक्त काहीच नव्हत , मग उत्तर द्यायला कशाला वेळ घालवावा “
गोष्ट संपली.
बदनामी करणाऱ्या ,चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट वाचून त्यावर रागाने प्रत्युत्तर देताना आपण नेमक काय करतोय आणि काय करायला हव ह्याचा नीट विचार करा.
सुप्रभात !!
No comments:
Post a Comment