Blog Archive

Monday, 3 October 2016

गांधीं समजण्याचा काळ बापूंना मनसोक्त शिव्या घालण्याचा काळ ... त्यानंतर येते ती प्रगल्भता, वैचारिक परिपक्वता....-सुहास भुसे

एक काळ असतो बालपणीचा ...
'दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल' अशी गाणी भक्तिभावाने गुणगुणन्याचा ..
नंतर येते हे गाणे फोल आणि विनोदी वाटण्याची तारुण्यावस्था ..
बापूंना मनसोक्त शिव्या घालण्याचा काळ ...
त्यानंतर येते ती प्रगल्भता, वैचारिक परिपक्वता. बापुंना अभिप्रेत  'आजादी' फक्त इंग्रजांसारख्या बाह्य शत्रुंपासूनच नव्हे तर स्वत:च्या अंतर्मनात दडलेल्या षड्रिपुरूपी शत्रुंपासून आहे हे कळण्याचा काळ ....
महात्मा गांधी ही एक व्यक्ति नसून एक विचार आहे हे समजण्याचा काळ ...
..
गांधीवाद्यांचा 'भक्त ते अनुयायी' हा संक्रमणात्मक प्रवास पूर्णत्वाकडे नेणारा, आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रवास आहे.

No comments:

Post a Comment