बहुरूप गांधी हे पुस्तक आपल्या मुलांनी वाचायलाच हवे. तुम्ही वाचले का ?
गांधी स्वत: पीठ दळत. शौचालय साफ करीत. कपडे धूत, रुग्णांच्या जखमा धूत, चप्पल शिवत. गांधींच्या या आपल्याला माहीत नसलेल्या गांधींचा परिचय ‘बहुरूप गांधी’ या पुस्तकात अनु बंडोपाध्याय यांनी करून दिलाय. या पुस्तकाला पंडित नेहरू यांची प्रस्तावना आहे. शोभा भागवत यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. एकूण २७ छोटय़ा प्रकरणांतून गांधींचे विविध पैलू दाखविले आहेत. पुस्तकातील प्रकरणांची शीर्षकं शिंपी, धोबी, न्हावी, भंगी, चांभार, नोकर, स्वयंपाकी, डॉक्टर, वीणकर, लेखक, पत्रकार, मुद्रक, गारुडी अशी आहेत. गांधीजी ती भूमिका कशी जगले, हे गोष्टीरूपाने दिले आहे. ‘महात्मा’ असलेला हा माणूस छोटय़ा छोटय़ा कष्टाची कामे समरसून करत होता. आपण शरीरिक श्रमांना किंवा ती करणाऱ्या माणसांना कमी लेखू नये, हे सांगत श्रमाची प्रतिष्ठा उंचावणारं हे पुस्तक आहे. आर. के. लक्ष्मण यांची गांधींजींची वेगवेगळी अर्कचित्रे, हे पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे.
बहुरूप गांधी, कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, (संपर्क शोभा भागवत 9960173570 )पुणे व मनोविकास प्रकाशन
No comments:
Post a Comment