Blog Archive

Monday, 3 October 2016

गांधीवर गोळ्या चालवणाऱ्या स्वयंघोषित देशप्रेमींनी एकदाही इंग्रजांवर गोळी चालवली नाही.अप्पा अनारसे

गांधीवर  गोळ्या चालवणाऱ्या   स्वयंघोषित  देशप्रेमींनी   एकदाही  इंग्रजांवर  गोळी  चालवली  नाही. केवढे हे देश प्रेम !  एका  निशस्र्  वृद्धाचा खून  करणे  यात कसले  आले शौर्य ? सारखी  संस्कृतीच्या नावाने तुतारी वाजवणाऱ्याने  राष्ट्रपित्याची हत्या करणे   भारतीय संस्कृतीत  बसते  का ? एवढे  असूनही  आजही  महात्मा गांधीच्या नावाचा  वापर राजकारणासाठी काँग्रेस , भाजपा सह सर्वच पक्ष करताना दिसतात. मग ते गांधींना शिव्या देणे का असेना पण गांधींना ओलांडून पुढे जाता येत नाही यातच सर्व काही येते. भारताचे माजी पंतप्रधान चंन्द्रशेखरजी हे  ' पोलिटिकली करेक्ट' भूमिका  घेण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना याचे मर्म विचारले असता ते   मानवतावाद, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आणि  महात्मा गांधी प्रणीत राष्ट्रवाद यामुळे ते  ' पोलिटिकली करेक्ट' भूमिका घेऊ शकायचे. प्रत्येकानेच   गांधीला मानलेच पाहिजे असा काही आग्रह नाही, पण त्यांना शिव्या द्यायच्या अगोदर त्यांच्या विषयी थोडी काही माहिती जरूर वाचायला पाहिजे ... . पण अभ्यास न करता इतरांच्या अपप्रचाचे बळी होऊ नका .....प्रत्यक्ष गांधी वाचून खुशाल गांधींना शिव्या द्या ,,,,कसेही करा गांधी आडवा येतोच.

No comments:

Post a Comment