बापू ईज अल्वेज ग्रेट……!!!
कधी तरी अस बी घडल होत म्हने 'तु एक गालावर मारली की दुसरा गाल पुढ कर' अस तो बोलायचा. आम्ही शिव्या घालत होत बे त्या बुढ्याले.........कोण तो 'टकल्या' अस बी बोलायचो बे तेले
या देशात असा ही हाडामासाचा माणुस होता म्हणे... तो सर्वाच्या पुढ झपाझपा चालायचा कंबरेला पंचा, पायात वाहणा अन डोळ्यावर चष्मा घालुन हिडायचा… इषेस म्हणजे तो बोलायचा अन लोक ऐकायचे ... त्याने दोन चार दिस अन्न नाही घेतल की गोऱ्या् साहेबांना धडकी भरायची म्हणे. आवो माणसाने आंदोलन करावी तरी कीती.. गेल्या शतकाच्या सुरवाती पासुन काळेगोरेचा रंगभेदला हात घालुन सुरवात करत देश स्वातंत्र्य होईस्तोर घडलेल्या धार्मिक हिंसा पर्यतं ....ती ही वर्षाला सरासरी दोन . . . . हे काय $ हा माणुस बैरीस्टर बी होता आणि दक्षिण अफ्रिकेत २१ वर्षे राहत वर्ण व्यवस्थे इरुध लढा देत राहीला उगाचच का तो मार्टीन ल्युथर कींग, नेल्सन मंडेला पासुन बराक ओबामा यांचा आदर्श बनला.
राहायची जागा आश्रम .. फावल्या वेळेत सुतकताई आणि स्वदेशीवर विवेचन... इथल्या खुराड्यात सडत असलेल्या ला स्वातंत्र्य म्हणजे काय हे कधी माहीती ब्बा...त्यों तर अगुदर पासुन जाचक पंरपरेची गुलामगीरीच भोगत होता. पण या बुढ्याची भुरळ त्या हरीजनालेही पडली ... याची गिताई त्याला भावली. आम्हाला आंदोलन म्हण्जे दोन चार यस्ट्या फोडायच्या, हाणामारी करायचे आणि फोटो काढायचे ......पण यांचे मिठाचे आंदोलन साबरमती ते दांडी पर्यंत तब्बल अडीच्शे मिल पायदळी तुडवले होते म्हणे या लोकानी.
यो बाबा सहिष्णु होता…… हिंदु होता ..त्या काळचा प्रभाव बघता वर्णश्रम मानणारा होता… कालांतराने मत बदलत होती.… ह्यो बूढा अस्पृश्यनिवारणाची काम हाती घतोय…… हे बघून इथले कर्मठ सनातनी दुखावत होते. असो
तुमच्या बैनवॉशला आम्ही भुललो.... तुमच 'ते' नाटक, ५५ कोटी, मुस्लीमांच लागलुच्चन च्या प्रचंड प्रभावाखाली या माणसाला मीही शिव्या दिल्यात अगदी पाचसात वर्ष अगोदर पर्यन्त हेच सुरु होत……याच खरच दु:ख आज ... यांची अहींसेची ताकद तुमच्या कैक गोळ्या पेक्षा मोठी...यांच्या सत्याचे प्रयोग तर तेच करु जाणे ………बस एकदा मनसोक्त रडलोय……
गांधी हा माणूस होता…… माणूस म्हणून तुम्ही वाद घालू शकतात… खुशाल घाला पण गांधी बाबा ग्रेट होता.
तुम्हाला आवडो वा नावडो पण या माणसावर चाळीस हजार पुस्तके मासिके लिहल्याचे ज्ञात आहे.. तुमचा जळजाळात कीतीही असला तरी युरोप, कॅनडा,जर्मनी देशा विदेशात स्मारक उभारली या महतंच्या नावाने. इथल्या अस्स्ल वैरीनाही विदेशात फिरताना या सद्गृहस्थाची आठ्वण काडित भाषणाची सुरवात करावी लागते. अजुन महत्वाचे हे म्हतार थोर आहे हे सांगायला तुमच्या आमच्या खिशात असलेले पैशाची नोट काफी आहे.
First they ignore you, then laugh you,
Then fight you, at last you win.
---यदु पाटील
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10209298053106054&id=1164333951
No comments:
Post a Comment