Blog Archive

Monday, 3 October 2016

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच ते...अंकित ठाकूर

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो. गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधी प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो.
2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दिवस.त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला.. स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला. आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला, आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला....
उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महान मार्गदर्शक तत्वज्ञ आज गांधी जयंती. निदान आजच्या या शुभदिनी तरी भारतासह सार्‍या  जगाला शांततेचा संदेश देणार्‍या  महात्मा गांधींचे विचार समजवून घेण्याचा प्रयत्न करू या. ...

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.

इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशायांना वीरोध केला.पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न,अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे,सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

No comments:

Post a Comment