*गांधी एक धैर्यशिल योद्धा...*
दंगलीत तलवारी (दंगलितल्या तलवारी म्हणतोय... नाहीतर काहीना तलवारी म्हणजे स्वताच्याच बाप-जाद्यांची जायदाद वाटते, आपण दंगलखोर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा..!) घेऊन उतरणारे कधिच योद्धे नसतात.. तलवारीच्या मागे हात असतात ते भित्र्या माणसांचे, तर खरे योद्धे ते असतात जे निशस्त्रपणे दंगलित घुसून दंगल थांबवतात..!
ते धैर्य गांधीच्यात होत..! म्हणून ते धैर्यशिल योद्धा...
मी आंबेडकरवादी आहे आणि आंबेडकरवादीच राहीन यात तसुभर कोणाला शंका घ्यायला वाव देणार नाही.. पण गांधी आंबेडकर वाद इतकाच गांधी आमच्यासमोर ठेवण्यात आला...
वादाची ठिनगी पडण्याआधी गांधी आंबेडकर संबंध कसे होते? खरच त्यांच्यात मतभेदासोबत मनभेद देखील होते का?
तस असत तर चवदार तळ्याच्या काठी गांधीजी की जय ही घोषणा कशी आली असती?"
या सगळ्यांचा खरच अभ्यास करण आणि गांधी आंबेडकर वाद समजून घेऊन त्यातूनही समान मुद्दे सोबत घेऊन चालण आज गरजेच आहे... आमचा शत्रु डिफाइन आहे..! संघ हाच आपला नंबर 1 चा शत्रु आहे..!
आणि
संघालाही माहीत आहे इथला आंबेडकरवादी हां आपला नंबर एकचा शत्रु आहे.. आणि ज्यानी गांधीची हत्या केली तेच संघवादी गांधी डोक्यावर घेऊन मिरवताना दिसत आहेत.. नक्कीच गांधींमध्ये त्यांच्या विरोधी काहीतरी आहेच..!
चला गांधी अभ्यासुया.. गांधी आंबेडकर एकत्र घेऊन लढाई लढुया विजय आपलाच आहे..!
गांधींना जन्मदिनी विनम्र अभिवादन..!!!
जय भिम
-राजवैभव कांबळे
8600810043
No comments:
Post a Comment