गांधीजी हा एकच असा नेता भारतात झाला ज्या नेत्याला आम्ही जयंतीच्या दिवशी देखील औचित्य वगैरे धाब्यावर बसवून शिव्या देऊ शकतो!
कुसुमाग्रजांच्या मते या माणसाच्या मागे फक्त सरकारी कार्यालयाच्या भिंती होत्या, कोणतीच जात पाठीशी नव्हती! ज्यांच्या जातींचे अनुयायी भक्कमपणे पाठीशी असतात त्या नेत्याची निंदा करायची कोणाची हिंमत होत नाही.
गांधीवादी चिडत नाहीत, रागावत नाहीत. तोडफोड करत नाहीत, एसटीवर दगड मारत नाहीत. कोणी कितीही टीका केली तरी उत्तर देत नाहीत.
आज रात्रीच फेसबुकवर येऊ शकलो आणि विचारवंतांपासून कट्टर धर्मवाद्यांपर्यंत अनेकांच्या गांधीजींची नालस्ती करणार्या पोस्ट्स वाचल्या. इतर राष्ट्रनेत्यांच्याही बाबतीत असं घडलं असतं पण त्यांच्या मागे असलेल्या त्यांच्या जाती किंवा संघटनांचा आक्रमकपणा त्यांना वरदान ठरतो.
No comments:
Post a Comment