मनोहर दिवाण हा असाच एक ध्येयवेडा तरुण होता. त्या वेळी कुष्ठरोगावर फक्त मिशनरीच काम करत. मात्र, गांधींजींच्या एका वाक्यावर या तरुणानं 60 वर्षं कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं व्रत अंगिकारलं. वर्ध्याजवळच्या दत्तपूरमध्ये कुष्ठरोग्यांसाठी काम करणारा हा पहिला भारतीय हिंदू माणूस! गोपाळ वाळुंजकर हाही असाच गोल्ड मेडलिस्ट. गांधीजींना “मी काय करू’ असं विचारायला आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, “”जा, मेलेली गुरं फाड आणि चर्मकारांना शिकव कशा चांगल्या चपला बनवायच्या!” या तरुणानं बापूंचा शब्द प्...रमाण मानून आयुष्यभर हेच केलं. चर्मशास्त्र विकसित केलं. त्याचप्रमाणं आप्पसाहेब पटवर्धन हाही गोल्ड मेडलिस्ट तरुण, ज्याला पुढं “कोकणचे गांधी’ म्हणून ओळखलं गेलं. गांधीजींनी या ब्राह्मण तरुणाला सांगितलं, “”सफाईकाम करण्यासाठी आपण जी एक जात निर्माण केलीय, तिला करावं लागणारं काम हे भारतीय समाजावरचं लांछन आहे. जा, तिथं काम कर.” आणि या तरुणानं आयुष्यभर हेच काम केलं. जेलमध्ये गेल्यावरसुद्धा या माणसानं “मला “क’ वर्गाची व्यवस्था द्यावी’ अशी विनंती केली. तसंच जेलमध्येसुद्धा जेलच्या सफाईचं काम द्यावं, ही मागणी केली. अशी माणसं आणि अशी त्यांची ध्येयनिष्ठा.
गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात नेमकी काय जादू होती? त्यांचं आयुष्य एक मिशन मानायला हवं. जो अंतिम माणूस आहे, शेवटचा माणूस, त्याची समस्या घ्यायची, असं विलक्षण आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. राम मनोहर लोहिया फायर ब्रॅंड वक्ते म्हणून त्या वेळी ओळखले जात. मात्र डॉ. लोहिया, नेताजी सुभाषबाबू, पंडित नेहरू असे सारेच नेते गांधीजींना भेटत आणि म्हणत, आम्ही इतक्या तयारीनं बोलतो, पण त्याचा इतका प्रभाव पडत नाही. मात्र तुम्ही काय बोलता हे लोकांना धड कळतही नसावं, तरीही कोट्यवधी माणसं तुमचं ऐकतात, हे कसं? त्या वेळी गांधीजी म्हणत, “”मी जे जगलो नाही ते मी लोकांना सांगितलं नाही.”
द. आफ्रिकेपासून गांधीजींनी संडास साफ करण्याचं काम स्वत: केलं. चपला बनवायचंही ते शिकले. म्हणूनच गोपाळ वाळुंजकर असो वा अप्पासाहेब पटवर्धन, या माणसांना त्यांनी तेच सांगितलं जे त्यांनी स्वत: केलं होतं. म्हणूनच त्यांच्या “नई तालीम’ पद्धतीचं शिक्षण म्हणजे जगण्यातून शिक्षण आहे. उदा. मूल कसं चालतं? प्रेम कसं केलं जातं?
सेवाग्राम ते शोधग्राम – डॉ. अभय बंग
अभय बंग
full article- https://lekhsangrah.wordpress.com/page/24/
सर्च, पो.ऑ.शोधग्राम,
जिल्हा गडचिरोली, पिन कोड – 442 605.
फोन : 07138 – 255406/255407
द. आफ्रिकेपासून गांधीजींनी संडास साफ करण्याचं काम स्वत: केलं. चपला बनवायचंही ते शिकले. म्हणूनच गोपाळ वाळुंजकर असो वा अप्पासाहेब पटवर्धन, या माणसांना त्यांनी तेच सांगितलं जे त्यांनी स्वत: केलं होतं. म्हणूनच त्यांच्या “नई तालीम’ पद्धतीचं शिक्षण म्हणजे जगण्यातून शिक्षण आहे. उदा. मूल कसं चालतं? प्रेम कसं केलं जातं?
सेवाग्राम ते शोधग्राम – डॉ. अभय बंग
अभय बंग
full article- https://lekhsangrah.wordpress.com/page/24/
सर्च, पो.ऑ.शोधग्राम,
जिल्हा गडचिरोली, पिन कोड – 442 605.
फोन : 07138 – 255406/255407
No comments:
Post a Comment