लहानपणी गांधीजींना खूप शिव्या घातल्या.. फाळणीचा गुन्हेगार, पाकिस्तान निर्माण करणारा म्हातारा, ताकद नसल्यामुळे अहिंसेचा ढोंग करणारा ढोंगी; असे अनेक बाबतीत गांधी माझ्या मनात खलनायक बनून राहिले.. पण बालपणीचे गांधी नंतर वाचनात हळू हळू गायब झाले. लहानपणीचे नंगेपंजे गांधी आता हळू हळू महात्माचे रूप घेत होते. माझ्या शिक्षणाच्या इतिहासातून गांधी समजण्या ऐवजी या शिक्षणाने गांधी दूर गेले होते; तेच गांधी अवांतर वाचनातून खरे कळले..
गोळी मारली कि गांधी संपतील या बुरसट विचार करणाऱ्यांची कीव येऊ लागली.. आज सुद्धा अश्या महाभागांकडे बघून दया येते. एकीकडे गांधी सातासमुद्रापार पोहोचले आणि दुसरीकडे नथुराम सारखा व्यक्ती त्याचे अस्तित्व महाराष्ट्रात टिकवण्यासाठी धडपड करतोय..
1915 ला गांधी भारतात येतात आणि 1919 च्या रौलट कायद्यामुळे जगाला माहिती होतात. 1919 ते 1947 या 28 वर्षात गांधीजी साडेसहा वर्ष तुरुंगात राहिले. म्हणजे या महात्मा ले वेळ भेटला तो साडेएकवीस वर्ष. या दिवसात एकही दिवस खंड न पडू देत या अवलियाने दिवसाचे 18 तास काम केले आहे. म्हणजे एक वर्षात 6570 तास सतत काम. आणि एकूण 138000 तास काम.
आता यातील त्यांचा प्रवास वेळ कमी केला तर आणखी वेळ कमी होईल, पण या साडेएकवीस वर्षात या माणसाने प्रथमतः स्वातंत्र्य चळवळ संपूर्ण भारतात नेली भारताच्या खेड्यापाड्यात आणि सर्व सामान्य माणसात नेली. किती खेडे या अवलियाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणली हो??
साडेएकवीस वर्षात 7 लाख खेडे आणि 2 वृत्तपत्र चालवणारा हाच तो म्हातारा..
याशिवाय अस्पृश्यता निवारण चळवळ, दारूबंदी चळवळ, हजारो पृष्ठांचे लेखन, खादी निर्मिती उद्योग बुनियादी शिक्षणाच्या शाळा सुरु करणे, कुष्ठरोग निर्मूलन चळवळ, निसर्गोपचार आरोग्य चळवळ, हिंदी प्रसारण चळवळ इत्यादी गोष्टी याच माणसाने केल्या... आणि विशेष म्हणजे याचा प्रसार करताना गांधीजी जवळ फेसबुक किंवा व्हाट्सअप सुदधा नव्हते.. गांधी विचार पटो अथवा न पटो; पण तुम्ही एकांगि वाचक नसाल तर गांधी तुम्हाला नक्कीच महात्मा वाटतात...
महापुरुषांच्या भाऊगर्दीत गांधीजी एकमेव महात्मा आहेत ज्यांना अजुनहि एक विशिष्ट धर्म, विशिष्ट जात स्वतःसाठी विभागून घेऊ शकत नाही... यातच या महात्माचे महानपण मला सापडले... विनम्र अभिवादन��
- गणेश घुगे.
Wa...uttam
ReplyDelete