Blog Archive

Wednesday, 18 January 2017

ससून हॉस्पिटलमधील थरारक अनुभव

ससून हॉस्पिटलमधील थरारक अनुभव
काल रात्री 09.00 ते पहाटे 4.00पर्यंत पुण्यातील हडपसर,खडकी,पुणे स्टेशन,भवानी पेठ, स्वारगेट अश्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गरजू शोधून (Blanket donation )गोधडी वाटप केल्यावर पुणे रेल्वे स्टेशनवरून चांगले विचार समूहाची एक टीम घरी निघतच होती कि तेव्हा अमोलचा फोन आला
ससून हॉस्पिटलमध्ये या, "एका अंध मुलाचा पाय fracture झाला आहे महानगरपालिकेजवळ" फोन कट झाला

स्टेशनच्या पार्किंगवरून गाडी काढली, मी निलेश आणि हर्षलभैया निघतच होतो की पुन्हा समतादिदींचा फोन आला "सिरीयस केस झाली ए लवकर ये"
मनात थोडेसे धस्स झाले म्हटलं काय करायला आलतो आणि काय झाले मनात चक्र सुरु झाले रात्री अचानक कुणी गाडीच्यामध्ये तर आल नसेल ना?  किंवा इतर काही झाले तर नसेल ना?एक मन हेही सांगत होते कि त्यांनी कुणाला मदतही केली असेल पण तरीही एक मन अस्वस्थ होते
ससूनमध्ये गेलो तेव्हा थोडासा दिलासा मिळाला
तर प्रकरण असे झाले होते
चांगले विचार समूहाची जी एक टीम समता दिदींच्या गाडीत महागारपालिका रस्त्याजवळ कोणी गरजू दिसतंय का ते पाहण्यासाठी गेली होती तेथून वळताना त्यांना 3 तरुण दुभाजकाजवळ तिथे अस्वस्थ दिसले गाडी बरीचशी पुढे गेल्यावर समतादीदीला काहीसा doubt आला की ती मुले अंध असावीत म्हणून आणि तिने U turn घेतला
तर खरच ते तिघेही अंध तरुण होते आणि गाडी किंवा रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तिघांनाही दिसत नसल्यामुळे त्यांना रिक्षा वगैरे काही थांबवता आली नाही आणि इतर काही साधनही  मिळाले नाही.अनेक गाड्या त्यांच्या जवळून गेल्या कुणालाच काय कसे वाटले नाही का कुणी त्यांची साधी विचारपूसही केली नाही किती कठोर हृदयी झालो आहोत आपण पुणेकर.त्यातील लक्ष्मीकांत या तरुणाचा रस्ता ओलांडताना खड्डा दिसत नसल्यामुळे त्यात पाय जाऊन शरीराचे पूर्ण वजन त्यावर पडून तो पाय वाकडा झाला होता तर इतर दोघे जण तो पाय नीट करण्याचा प्रयत्न करत होते.टीमला ते समजताच चैतन्य त्यांना रिक्षात बसवून ससून मध्ये घेऊन  गेला (त्याचे मित्र त्याला मंगेशकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगत होते)तिथे गेल्यावरही रिक्षावाल्या काकांनी भाडे घेतले नाही त्यांना पैश्याचा आग्रह केला असता 'माझेही माणूस म्हणून पण काहीतरी कर्तव्य आहे' असे ते म्हणाले
सरकारी हॉस्पिटल म्हणजे लवकर कुणी बघणार नाही असे आम्हाला वाटले होते पण अनुभव वेगळाच आला
डॉक्टरांनी तत्परता दाखवलीे आणि काही सेकंदातच त्याच्या पायाचे dislocation काढले(हाड सरळ केले) X ray चे reports येऊसतर सर्वांना काळजी होती की आता काय होईल पण Xray मध्ये सर्व reports नॉर्मल आले आणि आमचा जीव भांड्यात पडला नंतर तेथून त्याला आंबेडकर वसतिगृहात घेऊन गेलो आणि निरोप देऊन घरी आलो.
आता आंम्हाला दिव्यदृष्टी असलेले 4 नवीन मित्र मिळाले आहेत काही वेळापूर्वीच त्यांच्यातील अमोल आणि विद्याधर यांचा फोन येऊन गेला लक्ष्मीकांतला बरे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.वारंवार आभार मनात होता.सोबतच ससूनमध्ये फ्री उपचार झाल्याने  पैसे परत घेऊन जा म्हणूनही तो सांगत होता(तिथ हॉस्पिटलमध्येे काय होईल हे माहित नसल्यामुळे अमोल आणि चैतन्य दोघांनी त्याच्या मित्राकडे काही पैसे दिले होते अमोल आणि चैतन्यला मी त्याबद्दल इथे लिहलेले आवडणार नाही हे माहित आहे पण हे तुमच्यासाठी नाहीतर पैसे परत करण्याच्या त्या अंध मित्रांच्या प्रमाणिकतेबद्दल सांगण्यासाठी मी इथे तो उल्लेख केला आहे) या निमित्त अजून एक गोष्ट सांगू इच्छितो आत्ताच्या नवीन नोटांमध्ये brail लिपी नसल्यामुळे कोणत्याही अंध माणसाला ती ओळखता येत नाही व अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो रु.1 ते रु.100  इत्यादींच्या नोटा ते सहज हात लावून ओळखू शकतात पण नवीन नोटांमध्ये अशी काही सोयच नाही येथे गांधीजींची एक गोष्ट आठवते
जेव्हा भारताचे पहिले संविधान बनवले जात होते त्यापूर्वी त्यातील काही जण गांधींजीकडे मार्गदर्शनासाठी आले होते तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले होते
" I shall give you a talisman. When faced with a dilemma as to what your next step should be, remember the most wretched and vulnerable human being you ever saw. The step you contemplate should help him !" जेव्हा मनात कोणती शंका येईल तेव्हा हे लक्षात ठेवा कि तुम्ही जे काही पाऊल उचलाल त्यामुळे तुम्ही आतातपर्यंत भेटलेल्या सर्वात गरीब किंवा समाजच्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाचे भले होईल
गडचिरोलीत आरोग्यसेवेत कार्य करणारे अभय बंग,कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे बाबा आमटे पासून ते सत्यार्थी आणि अनेक जण वरील विचारातून प्रेरणा घेऊन कार्य करत आहेत.(नवीन नोट तयार करताना या अंध व्यकतींचाही विचार करायला हवा होता का ? जो आत्तापर्यँत दरवेळी केला जात होता याचा विचार करायला हवा पण तूर्तास दुर्लक्ष करूया)
                                    
फोटोत डाव्या बाजूला बसलेला जाड तरुण आपण बघताय तो विद्यार्थी म्हणजे लक्ष्मीकांत परब.

समतादीदी, अमोल, चैतन्य , सुप्रिया (चांगले विचार टीम) आणि लक्ष्मीकांतच्या मित्रांच्या समयसुचकतेमुळे त्याचा पाय fracture होण्यापासून वाचला.

रिक्षाचालक, सरकारी हॉस्पिटल,  तेथिल कर्मचारी या सर्वांबाबतचा हा एकदम वेगळाच अनुभव होता एवढे समजले कि तुम्ही जर एक चांगले पाऊल उचलले तर अशी चांगली पाऊले उचलणारे अनेक जण तुम्हाला भेटतात

ब्लॅंकेट donation मध्ये ही असाच एक सुखद अनुभव आला खालीलशब्द निलेशचे आहेत
काही श्रीमंत लोकांच्या गरजा कधीच संपत नाहीत  पण काहीजण असे भेटतात की  ते गरजेपुरते असलं तरीही इतरांना देऊन नंतर स्वतः त्याचा उपभोग घेतात जास्तीची अपेक्षा करत नाहीत तर कोणी जास्तीच देऊ केलं तरीही नम्रपणे नकारही  देतात. असाच  काहीसा अनुभव  'ब्लॅंकेट डोनेशन' करताना आला.
भिडे पुलाजवळील नदीपात्रातील रस्त्यावरील  एका पुलाखाली छोट्या मंदीर जवळील बाकड्यावर झोपलेल्या एका माणसाने (त्याच्याकडे  अंगावर एकच घोगंडी होती  पण खराब वाटत होती) आम्ही देऊ केलेली  धोगंडी  चक्क  गरज  नाही  म्हणून नम्रपणे नाकारली. मग आम्ही त्याला अंथरायला तरी होईल ही गोधडी म्हणून विचारले पण त्यावरही  त्याने  माझ्याकडे  आहे  अंथरायला असे सांगून तीही नाकारली. असा हा कुडकुडत्या  थंडीत, खुल्या आकाशाखाली, छोट्याश्या  बाकड्यावर,   उघड्या अंगावर घोगंडी  घेऊन  तो माणूस  आम्हालाच जगण्याचं  तत्वज्ञान  सांगुन  गेला.

संकेत मुनोत
Whatsapp number -8087446346
चांगले विचार युवा समूह
#चांगलेविचारसमूह  #Blanketdonationdrive #सुखदअनुभव

No comments:

Post a Comment