👆🏼👇🏻our news in दै. पुढारी
नेटवर्किंगच्या माध्यमातून ‘सोशल वर्क’
By pudhari | Publish Date: Jan 21 2017
पुणे : शंकर कवडे
*सोशल नेटवर्किंग साईट्सच्या वापराने तरुणाई बिघडत असल्याचा आरोप एकीकडे होत आहे. मात्र, याच्या माध्यमातून काही ग्रुप मात्र समाजाशी आपली नाळ जोडण्यासाठी धडपडत आहेत*. *धार्मिक सलोखा राखणे, आंतरजातीय विवाहातील समस्या; तसेच पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून ते सोशल मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहेत.*
व्हॉट्सअॅप, फेसबुक, हाईक, टेलिग्राम, हँगआउट्स, जी टॉक, इस्टाग्राम आदी माध्यमांचा *वापर केवळ मनोरंजन म्हणून न करता त्यामार्फत हे तरुण वैचारिक मंथन करत आहेत.* एवढेच नव्हे तर मानवी हक्कांचा प्रचार-प्रसार करण्याचे कामही *नवी पिढी उत्साहाने* करताना दिसते.
*संकेत मुनोत यांनी ‘नोइंग गांधीझन्स’*हा ग्रुप केला आहे. *देश आणि विदेशात गांधी विचार* पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअॅपसह फेसबुकवर सुरू असलेल्या या ग्रुपमध्ये *तुर्की, युगांडासारख्या देशातील तरुण* जोडले गेले आहेत.
*जगात शांतता राहावी, यासाठी गांधी विचारांचा प्रसार हा ग्रुप करीत आहे* या ग्रुपमध्ये महात्मा गांधी यांचे खापरपणतू *तुषार गांधी, सुनील गोखले, अॅड. असिम सरोदे* यांचा सहभाग आहे. विविध ग्रुप्स, तसेच पेजच्या माध्यमातून तरुणाई समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून सुरू केलेले उपक्रम यापुढेही कायम ठेवत त्यामध्ये भर घालण्याचा तरुणाईने केलेला निश्चय कौतुकास्पद आहे.
Link- Follow this link to join our WhatsApp group: https://chat.whatsapp.com/AfWc4tE2yrK8KTwHeuVUZx
http://www.pudhari.com/news/pune/124510.htmlKnowing Gandhism :
No comments:
Post a Comment