पुरोगामी लोकांनी नास्तिक असणे आणि देवा धर्मावर प्रखर टीका करणे हे आपले पुरोगामित्व सिध्द करण्यासाठी करणे compulsory आहे का?इतिहासात संत तुकाराम, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक व्यक्ती धार्मिक वा अध्यात्मिक होत्या त्यांनी कोणते कर्मकांड केले नाही पण धार्मिक लोकांकडे कधी कुत्सित नजरेनेही बघितले नाही.आपल्या देशात जवळपास 95%समाज धार्मिक वा श्रध्दाळु आहे.गांधीजीच्या काळात 99%हिंदु समाज गांधीजीच्या मागे ठामपणे ऊभा होता तर स्वतःला हिंदु धर्मरक्षक वा तारणहार म्हणणार्यांच्या संघ हिंदु महासभा यांच्या मागे 1%ही हिंदु समाज नव्हता.गेल्या काही वर्षात ही मोकळी जागा तथाकथित धर्मरक्षकांनी भरलेली दिसते.चंद्रकांत वानखेडे सरांनी आपल्या पुस्तकात एके ठिकाणी याबद्दल लिहिले आहे धर्म म्हणजे गाय आणि हिंदुत्व म्हणजे त्यावरील गोचीड आपण त्या गोचिडाला मारण्याऐवजी गायीलाच मारले त्यामुळे गाय आपल्यापासून लांब जाऊन गेली खाटीकाकडे म्हणजेच धार्मिक लोक गेले धर्मांध लोकांकडे
माझे अनेक नास्तिक मित्र मैत्रिण आहेत आणि सर्वांना माझे समर्थनच आहे.सर्व विज्ञानवादी आहेत हे चांगलेच आहे. पण नास्तिकांमध्येही कर्मठ व टोकाची भूमिका घेणारा वर्ग वाढत आहे का आता? आपण सर्वसमावेशक भुमिका घेणार आहोत का कधी? विचार आणि व्यावहारिकपणा यात फरक आहे ना?practically विचार करणार का? शोषणावर आणि अधर्मावर टीका व्हावीच ते अवश्यकच आहे पण धर्मावरील टीकेचे काय? धर्म ही वाईटच गोष्ट आहे असे सांगतांना अनेक मंडळी दिसतात आणि एखाद्या पुरोगाम्याने लोकसंग्रहासाठी किंवा परिस्थिती चे भान ठेवुन एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला तर त्यावर खालच्या दर्जावर जाऊन टीका केली जाते(अनेक ऊदाहरणे आहेत, उदा.- प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात आरतीचे ताट हातात घेतले व आरती केली ज्यावरुन त्यांना नादान वगैरे ठरवले गेले).
धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपण आपल्या गोष्टीही त्यात सांगु शकतो ना आपले विचार त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतो ना?भजन कीर्तन प्रवचन ही सामान्यजणांपर्यत पोहचण्याची प्रभावी माध्यमे आहेत
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment