Blog Archive

Wednesday, 11 January 2017

गांधी आणि बहूजनवाद-डॉ. सदानंद मोरे

आज सर्वच राजकारण्यांची अध्यात्माचे राजकारणीकरण करण्याकढे अट्टाहास असताना 100 वर्षांपूर्वी गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण करण्याचा प्रयोग सुरु केला होता.दक्षिण आफ्रिकेतुन भारतात परतल्यानंतर गांधींनी गोखले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारत सेवक समाजामध्ये काम करण्याकरिता केलेला विनंती अर्ज या संघटनेच्या पदाधिका-यांनी फेटाळला. गांधीचे व्यक्तिमत्व सभ्यपणाचे वाटत नाही असे या नकारामागे कारण होते.गांधींच्या व्याख्येतील स्वातंत्र्य म्हणजे आत्मक्लेश करण्याची शक्ती. ही व्याख्या त्यांनी दादासाहेब खापर्डे यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून संगितली होती.गांधी आणि टिळक यांचेमधील संबंध व संवाद पुर्वग्रह न ठेवता समजून घेतले पाहीजे. गांधींचा काँग्रेसमधील लखनौ येथे १९१६ मध्ये झालेल्या काँग्रेस प्रवेशास टिळकांनी मदत केली. त्याच पद्धतीने टिळकांचा काँग्रेसमधील पुनर्प्रवेश गांधींमुळेच झाला. अवंतिका गोखले यांनी लिहीलेल्या गांधीचरित्रास टिळकांनी प्रस्तावना दिलेली आहे.जिनांचा चरित्रकार म्हणतो की गांधींनी मुस्लिमांना उल्लू बनविले होते; परंतु जिनांनी वेगळा पाकिस्तान मिळवून आम्हाला वाचवले. याचाच अर्थ मुस्लिमांनी भारतातच राहावे अशी गांधींची मनिषा होती.गांधींना एकीकडे ब्राम्हणेतर विचारवतांनी ते ब्राम्हण्यसमर्थक अशी गणना करुन टीका केली तर दुस-या बाजुने टिळकांच्या अनुयायी ब्राम्हणांनी गांधींची हिंदुत्वविरोधी म्हणून टिंगल केली. टिळकाचे कट्टर अनुयायी दादासाहेब खापर्डे यांनी तर ‘गांधी ब्रिटीशांचे हेर आहेत’ अशी मुक्ताफळे उधळण्यापर्यंत मजल गाठली. खापर्डे यांचा मुलगा गांधीच्या सभेस हजर राहिला म्हणुन खापर्डे यांनी स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढण्यास मागेपुढे बघितले नाही.खापर्डे यांचा गांधीविरोध अगदी वेगळ्या कारणाने होता. गांधींनी भारतीयांना महाविद्यालयांवर, न्यायालयांवर व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा आपल्या लढ्यामधुन संदेश दिला. परंतु खापर्डे यांचे म्हणणे होते की या तिन्ही ठिकाणी ब्राम्हणांचे प्राबल्य असल्याने असा बहिष्कार ब्राम्हणांकरिता स्वतःवरील गंडांतर ठरेल.टिळकांची भुमिका तेवढीशी रास्त न वाटल्याने विनोबा भावे यांनी सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक म्हणून टिळकांएैवजी गांधींना गुरु म्हणून स्विकारले.एकीकडे गांधींना स्विकारायचे की नाही हा संघर्ष ब्राम्हणांच्या दोन गटात असताना महर्षी शिंदे यांनी गांधींच्या मार्गाने जाणा-या काँग्रेसमध्ये ब्राम्हणेतरांनी जावे याकरिता प्रयत्न केलेत. ही बाब स्वातंत्र्यलढ्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक धृवीकरणाची तत्कालीन परिस्थीती अधिक स्पष्ट करते.गांधींची प्रतिमा संपुर्ण जगभर एक मोठा तत्ववेत्ता म्हणून उभारण्यात ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे योगदान आहे; त्याचप्रमाणे गांधींना आंधळ्याप्रमाणे विरोध करण्यात सुद्धा महाराष्ट्र आजपर्यंत अग्रेसर राहिलेला आहे. यातुनच भारतीय राजकारणात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. कारण गांधींनीच एकदा म्हटले होते की ‘एकटा महाराष्ट्र जरी माझ्या पाठिमागे आला तरी मी भारताला स्वराज्य मिळवून देईन’, एवढे महत्त्व महाराष्ट्राला भारतीय राजकारणात तत्कालीन वेळेत होते.महाराष्ट्रीय जनतेत क्लेश सोसण्याची तयारी व प्रचंड बुद्धीमत्ता या गुणांमुळे गांधी प्रभावित झालेले होते. मात्र टिळकांच्या प्रभावाने महाराष्ट्राला गांधी नीट स्विकारता आले नाही.गांधींनी एकीकडे अहिंसेचा स्वीकार व प्रसार केलेला असला तरी दुर्बळांच्या अहिंसेचा त्यांनी धिक्कार केलेला आहे.

संदर्भ-गांधी शिबीर २०१५ आम्ही सारे फौंडेशन
Aamhi sare foundation.com
लेखन: सचिन चौधरी

संकलन-संकेत मुनोत

संपर्क-8087446346

#Knowing_Gandhism_Global_Friends

#Gandhi #inspiration 

चांगले विचार share करा

आपणही यात सहभागी व्हा
Share

No comments:

Post a Comment