Blog Archive

Friday, 13 January 2017

गांधी हा प्राणीच डेन्जर होता. त्याला वगळून कुणी पुढे जाणारच नाही

गांधी हा प्राणीच डेन्जर होता. त्याला वगळून कुणी पुढे जाणारच नाही. गांधी मेला नाही, मरणारही नाही. मुळात गांधी मरतच नाही.
                          
काँग्रेसला मतांसाठी गांधी हवा, तर कुणाला ब्रँड म्हणून गांधी हवा. कुणाला गांधीचे विचार हवेत, तर कुणाला टीका करण्यासाठी गांधी हवा. तर त्या शरद पोंक्षेंना पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी. कारण काहीही असो, गांधी लागतोच.
                             
किती आले किती गेले. काहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी केली तर काहींनी हव्या तेवढ्या हव्या तशा शिव्या दिल्या. #अल्बर्ट_आईन्स्टाईनसारख्या जगविख्यात शास्त्रज्ञाने गांधीचं तोंडभरुन कौतुक केलं, तर इकडे त्याच गांधीच्या त्याच्याच देशातला पोंक्षे नावाचा अभिनेता तथ्यहीन खोटी काल्पनिक नाटक बनवून पैसे कमवतोय. ज्या संघाची कायम विरोधी भूमिका राहिली, त्या संघाची राजकीय संघटना असलेल्या भाजपमधील नेत्यांनाही प्रातःस्मरणासाठी गांधी हवाय. म्हणजे काय, तर गांधी मरत नाही.
                     
काँग्रेसच्या पोस्टरवर गांधी
मोदींच्या भाषणात गांधी
केजरीवालच्या टोपीवर गांधी
अण्णा हजारेंच्या उपोषणात गांधी
हाॅलिवूड पिक्चरात गांधी
पोंक्षेच्या नाटकात गांधी
वर्ध्याच्या आश्रमात गांधी
आश्रमातल्या विश्रामात गांधी
ओबामाच्या तोंडी गांधी
स्टीव जॉब्स च्या चष्म्यात गांधी
मलालाच्या डायरीत गांधी
सत्यर्थीच्या लहान मुलांत गांधी
दलाई लामा च्या नोबेल पुरस्कारात गांधी
मंडेलाचं आयुष्य गांधी
इकडे गांधी तिकडे गांधी
जिकडे तिकडे गांधीच गांधी.
       
- नामदेव अंजनाची कविता एडिट करून
                      
#Repostedwithedit

No comments:

Post a Comment