Blog Archive

Monday, 1 August 2016

माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक माणसाकडून शिकत गेलोय. माझ्याशी चांगल वागणारी माणस चांगल कस वागाव आणि वाईट वागणारी माणस माणसांशी कस वागू नये हे शिकवत गेली.

गुरु मोठा असतोय आणि शिष्य लहान असतोय असल काही नसतंय.
आपल्याच मनाचे खेळ सगळे.

माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक माणसाकडून शिकत गेलोय.
माझ्याशी चांगल वागणारी माणस चांगल कस वागाव आणि वाईट वागणारी माणस माणसांशी कस वागू नये हे शिकवत गेली.

अपत्य म्हणून कस वागाव हे जस वडिलांनी शिकवलं तसच साथीदार काय असतो ह्या शब्दाचा अर्थ आयुष्याच्या जोडीदाराने शिकवला.
रक्ताच्या नात्यापलीकड नाती जपणारे मित्र नात्यांचा अर्थ शिकवतात.
आज माझ्या मुली मला पालक होण काय असतंय हे नव्याने शिकवत असतात.

माणसच का ?

आंब्याची कोय लावली तर तिला आंबे येतील आणि बाभळीच्या झाडाला काटे येतील हेही निसर्ग शिकवतो.
शिकवताना काय पेराव आणि काय पेरू नये ह्याचा विवेक शिकवतो.
आंब्याच्या गोडवा जसा आहे तसाच बाभळीचा काटाही उपयोगाला येतो ,
भिरभिर करायला नाहीतर पायात घुसलेला काटा काढायला.
जरी काटा मला उपयोगाला नाही आला तरी त्याचा पाला शेळ्यांना उपयोगाला येतो.
पाला खाताना अलगद काटे बाजूला सारावेत हे शेळ्याकडून शिकतो.

ह्या सगळ्या जगात निरुपयोगी अस काहीच नसत.
फक्त त्याचा उपयोग काय आहे हे शोधण्याची नजर असायला पाहिजे.

आंब्याची कोयही गुरु , बाभळीचा काटा हि गुरु , पाला खाणारी शेळीही गुरु , भवतालचा सगळा निसर्ग गुरु , काळी पांढरी करडी मातकट कशीही असली तरी आणि कुठल्याही का होईना पण कारणाने आयुष्यात आलेली माणसहि गुरु.

ह्या सगळ्या विश्वाला गुरु मानून त्याच स्मरण कराव , वंदन कराव ह्याला काही मुहूर्तही नाही.
पण पुढे चालत असताना ज्या वाटेवरून चाललोय त्या चालण्याला बळ देणाऱ्या ह्या सगळ्यांची आठवण ठेवण गरजेच असतय.
अशी आठवण आली कि मग आपल्या मर्यादा समजतात , विश्वाच्या पसाऱ्यात आपला ठिपका किती नगण्य आहे हेही समजत.
चुकूनमाकून पाय सुटू नयेत जमिनीवरून म्हणून अस थांबून माग वळून बघणं गरजेच वाटतय.

#आनंदग्यान
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1183816621638671&id=100000310327096

No comments:

Post a Comment