*जीवनाचे गटार करणा-या अनिष्ट सवयी कायमच्या सोडण्याचा संकल्प करणे म्हणजे गटारी अमावस्या...*
खरे तर आज जीवनाला सुखी व समृद्ध जीवनाची दिशा दाखविणारी ही आहे दर्श अमावस्या..
अमावस्या म्हणजे अज्ञान, अहंकारामुळे निर्माण झालेल्या दु:खरुपी अंधाराचे प्रतिक.
या अज्ञान व अहंकारामुळेच अनिष्ट चिंतन, नकारात्मक विचार, विघातक इच्छा, घाणेरड्या सवयी, इतरांचे मन दुखावले असे बोलणे, भांडण-तंटे इ. अनेक अनिष्ट आचरणातून आपला जीवन प्रवाह अक्षरशः घाण वाहून नेणा-या गटारा सारखा झाला आहे.
आपल्याच ठिकाणी असणा-या या अनिष्ट गोष्टी, दोष आपल्याला दिसू लागणे म्हणजे दर्श अमावस्या.
तुकाराम महाराज म्हणतात,
इतरांचे दोष काय म्या पहावे।
माझ्या कडे काय त्यांचे उणे असे।।
हा जीवनप्रवाह शुद्ध, आनंदी व समृध्द करायचा असेल तर या अनिष्ट गोष्टी व विकृत सवयी कायमच्या सोडून दिल्या पाहिजे.
पण याचा अर्थ या गोष्टी उद्या पासून सोडणार आहे मग आज प्रमाणाबाहेर उपभोग घेणे नव्हे.
उदा. उद्या पासून मांसाहार करायचा नाही म्हणून एकाच दिवशी लाखो कोंबड्या, मेंढ्या, बक-यांचे बळी घेणे.
दारु किंवा इतर व्यसने सोडणार आहे म्हणून प्रमाणाबाहेर त्यांचे सेवन करुन सुंदर शरीराचे अक्षरशः गटार करणे कितपत योग्य आहे.
आपल्या महान संस्कृतीने जीवनाला समृद्ध करणा-या रुढी परंपरा रुपी संस्कार आम्हाला दिले पण *"उपायच अपाय ठरावा"* अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली.
*संस्कृतीचा व्यर्थ अभिमान बाळगण्यापेक्षा ती समजून घेवून ख-या अर्थाने आचरणात आणणे हे महान संस्कृतीचे द्योतक आहे.*
*जीवनाचे गटार करणा-या अनिष्ट गोष्टी सोडून जीवनाला सुखी, समृद्ध करणारे ज्ञान संपादन करण्याचा संकल्प करणे म्हणजेच ख-या अर्थाने दर्श किंवा गटारी अमावस्या...*
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
............ शुभ दिवस .........
No comments:
Post a Comment