Blog Archive

Tuesday, 16 August 2016

हरिजनांची परिस्थिती सुधारण्याकरिता गांधीजी घडवत असलेली मूक सर्वंकश क्रांती

हरिजनांची परिस्थिती सुधारण्याकरिता गांधीजी घडवत असलेली मूक सर्वंकश क्रांती इथे दिसेल.
-----------
२३६. रतलाममधील हरिजन
मझ्या प्रार्थना प्रवचनात (पाहा प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर २६, १९४७) रतलाम येथील ज्या घोणणेचा मी उल्लेख केला होता ती खाली देत आहे. (तिच्यातील केवळ निवडक भाग दिला आहे.) ही घोषणा विजयादशमीला म्हणजे २ सप्तेंबर १९४७ला करण्यात आली होती. (स्पष्ट आहे की ही चूक आहे. विजयादशमी २४ ऑक्टोबरला होती.)
१. ज्याप्रमाणे सर्व देवळे सवर्णांकरिता पूजाअर्चेकरिता खुली आहेत त्याचप्रमाणे तीहरिजनांकरिताही उघडी असतील.
२. सर्व सार्वजनिक विहिरी आणि संस्थानाने बांधलेल्या सर्व विहिरी तसेच पाण्याच्या टाक्या, पाण्याचे नळ इत्यादी हरिजनांकरिताही उघडे राहतील.
३. सर्व सार्वजनिक ठिकाणे उदाहरमार्थ धर्मशाळा, हॉटेल, भोजनालय, दुकाने, रंगमदिर, चित्रपटगृह हे सध्याही एखाद्या विशेष वर्गाकरिता नाहीत. ते हरिजनांकरिताही उघडे राहतील आणि तिथे सवर्णांना ज्या सेवा, सोयी व सुविधा दिल्या जातात त्याच हरिजनांनाही दिली जातील. त्यांना सरकारने वा नगरपालिकेने परवानगी दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचाही उपयोग करण्याचीही परवानगी राहील.
४. हरिजनानांना शासकीय शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवेश दिला जाईल व त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
५. शासकीय नोकऱ्यांच्या भरतीमध्ये हरिजनांवर कोणतेही निर्बंध नसतील.
६.सर्व शासकीय कार्यालये, न्यायलये, रुग्णालये आणि इतर शासकीय इमारती यांच्यात हरिजनांना खुला प्रवेश असेल.
७.दागदागिने वा चांगले कपडे घालण्यावर, मिरवणूक काढण्यावर व सणवार साजरे करण्यावर हरिजनांवर कोणतेही निर्बंध नसतील.
शहरातील वा गावातील कोणत्याही भागात घर घेण्याबद्दल वा जमीन घेण्याबद्दल हरिजनांवर कोणतेही निर्बंध नसतील. ते कुठीही जमीन वा घर विकत घेऊ शकतील.
हरिजन, नोव्हेंबर ९, १९४७
-----------------
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९७, पृष्ठ २६२.

No comments:

Post a Comment