Blog Archive

Tuesday, 16 August 2016

गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते

गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते. नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेल्या एका पत्रात ते उदधृत केले आहे. नेहरू लिहितात : "बापूंनी श्री. गोळवलकरांच्या पहिल्या भेटीनंतर सांगितल्याचे स्मरते की त्यांनी (गोळवलकरांनी) काहीशी छाप टाकली हे खरे; पण मी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही. त्यांच्याशी झालेल्या दुसर्‍या व तिसर्‍या भेटीनंतर मात्र प्रतिकूल मत व्यक्त करून बापू म्हणाले, यांचा काही भरवसा देता येत नाही. ही मंडळी बोलताना समजूतदार, वाजवी भासतात. पण नंतर बोलल्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना कसलाही खंत, खेद वाटत नाही. माझंही मत तसंच झालं आहे."
(सिलेक्ट कॉरस्पॉन्डन्स ऑफ सरदार पटेल-१९४५-५० भाग २ सं. व्ही. शंकर, नवजीवन, अहमदाबाद)
Courtsey- pratik patil

No comments:

Post a Comment