Blog Archive

Sunday, 14 August 2016

स्वातंत्र्यसैनिकांचे तुलनात्मक बोगस लेख उत्तर

सध्या काही फेसबुकी भक्त आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे तुलनात्मक बोगस लेख अर्धवटपणे फॉरवर्ड करत आहेत
त्यामुळे हा लेख लिहावा लागला
 
कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .
कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.

सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते

बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते ....... चाफ़ेकर , खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते त्या वेळी हे फक्त हातात काठ्या घेवुन पाडव्याचे संचलन करत होते

लोकांना देवा धर्मावरुन जातीपातीवरुन भडकवत होते

तेव्हा संघटना म्हणून हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या  या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?

मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?
प्रेयसीवर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणायचं असेल तर सावरकरांच्या आदेशाप्रमाणे गांधीजीचा खुन करणाऱ्या नथुरामलाही देशभक्त म्हणता येईल
आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे.                                बाबांनो तुम्हाला सरळ वागता येत नसेल तर वाकड तरी वागु नका..!!
दऱ्या वाढतायत रे परस्परातील...
कमी करता येत नसतील तर किमान त्या वाढवू तरी नका..!!

देशाच्या सरहद्दीवर हजारो सैनिक भगव्या किंवा हिरव्यासाठी लढत नाहीत तर तिरंग्यासाठी लढत आहेत देशाचे ऐक्य तुटेल असे काही करु नका

(या सर्वांना एकमेकांविषयी प्रचंड आदर होता
आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
आकाशवाणीवरून गांधीजीना #राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी #सुभाषचंद्र_बोसच होते
तर सुभाषचंद्र बोस ना प्रथम नेताजी म्हणणारे गांधीच होते
शहीदेआजम #भगतसिंगांनीही तुरुंगामध्ये ऊपोषण केले होते शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.)

#जयहिंद
संकेत मुनोत
संदर्भ
1-गांधी सावरकर लेख संकेत मुनोत,लोकमत 15मार्च 2016
2-महानायक (सुभाषचंद्र बोस)- विश्वास पाटील
3-नये नेताओं के अलग विचार- भगतसिंह
4-इतर ऐतिहासिक पुस्तके व विकिपीडिया

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1215317871852595&id=100001231821936

No comments:

Post a Comment