स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसतोय
स्वातंत्र्य जस माझं असतंय तसंच ते देशातल्या प्रत्येक माणसाचं असतंय.
स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आपल्याला मिळणारे हक्क त्यासोबत आपली असणारी कर्तव्य हे एकत्रच असतंय.
माझं स्वातंत्र्य उपभोगताना त्यामुळे कुणाचं स्वातंत्र्य अडचणीत येऊ नये, कुणाचे हक्क डावलले जाऊ नयेत ह्याबद्दल सजग राहिलो तरच आपल्या स्वातंत्र्याला अर्थ आहे.
हजारो लोकांचा त्याग आणि बलिदान ह्यामधून मिळालेलं स्वातंत्र्य ज्या पिढ्यानी त्याची किंमत मोजलीय, त्या पिढ्या कधीच काळाच्या पडद्याआड गेल्यात पण ह्या स्वातंत्र्याची जपणूक आपण कशी करतो ह्याला काळ साक्षीदार असतोय.
दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या अतिशय मोजक्या देशात लोकशाही आणि लोकांच स्वातंत्र्य अबाधित आहे.
ते तसंच टिकवायची बुद्धी आणि प्रेरणा सगळ्यांना मिळो ह्याच शुभेच्छा !!
जय हिंद !!
Anand Shitole
No comments:
Post a Comment