Blog Archive

Saturday, 27 August 2016

किती जन्मांचा हा विटाळ-इंडिया अनटचड सतत सुरुचं आहे- Shriranjan Awate

[किती जन्मांचा हा विटाळ !
............................
विश्वास बसू नये असं आहे हे सारं. अस्वस्थ करणारं. इंडिया अनटचड हा माहितीपट सतत सुरुचं आहे असं वाटावं असा सारा प्रकार.
गुजरातमध्ये आजही ज्या पध्दतीने अस्पृश्यतेच्या प्रथेचा अवलंब केला जातो हे पाहून धक्का बसेल. मध्यंतरी रॉबर्ट एफ केनेडी जस्टिस फॉर ह्युमन राइटस आणि नवसर्जन ट्रस्टने केलेल्या सर्व्हेमधून समोर आलेल्या धक्कादायक बाबीः
१. १५६९ गावांच्या अभ्यासातून ९८ प्रकारच्या अस्पृश्यतेच्या प्रथा समोर आल्या.
२. ९८.१ टक्के गावांमध्ये दलित व्यक्ती दलितेतर मालकाच्या घरात राहू शकत नाही.
३. ९७.६ टक्के गावांमध्ये दलित दलितेतरांच्या भांड्यांना स्पर्श करु शकत नाही.
४. ६७ टक्के गावांमध्ये दलित पंचायत सदस्यांसाठी चहाचे वेगळे कप आहेत.  ५६ टक्के गावांमध्ये ढाब्यांवर दलित आणि दलितेतरांसाठी वेगवेगळे चहासाठीचे कप आहेत.
५. ५३ टक्के गावांमध्ये शाळांमध्ये दलित मुलांना वेगळे बसवले जाते.
६. गांधीनगर जवळच्या बाउली गावात दलितांसाठी वेगळं स्मशान आहे.
अगदी IG पोस्टपर्यंत पोहोचलेले निवृत्त राजन प्रियदर्शी उच्च जातीयांच्या दबावामुळे स्वतःसाठी शहराच्या मुख्य भागात घर घेऊ शकले नाहीत. आजही ते दलित-बहुल वस्तीत राहतात.
गुजरातमधील अनेक दलितांना कारसेवक म्हणून नेले होते. आयोध्येत 'देशसेवा' करताना त्यांचे हात पवित्र होते परत येताच पुन्हा ते अपवित्र झाले !
हे केव्हा संपणार कोण जाणे !
............................
माहितीसाठीः
संविधानातील कलम १७ः अस्पृश्यतेवर बंदी.
अस्पृश्यतेच्या प्रथेचे पालन करणा-या नेत्याची उमेदवारी रद्द होऊ शकते अशीही घटनात्मक तरतूद आहे.
Shriranjan Awate

http://www.bbc.com/hindi/india/2016/07/160725_gujarat_dalit_part_one_tk

No comments:

Post a Comment