Blog Archive

Monday, 1 August 2016

मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देणारा `लखनौ करार' देखील टिळकांनीच केला होता- नरहर कुरुंदकर

लो. टिळक व ना. गोखले हे दोघेही गांधींच्या आधीच्या पिढीतील श्रेष्ठ नेते. भारताचे नुकसान व्हावे असे गोखले किंवा टिळक यांच्या मनात होते असे त्यांचा शत्रूसध्दा म्हणणे शक्य नाही.

तथापि, ज्या विभक्त मतदारसंघांमुळे मुस्लीम लीग बळकट झाली व देशविभाजनाची मागणी करू शकली, जे विभक्त मतदारसंघ मान्य केल्यामुळे पाकिस्तान निर्मिती झाली, त्या विभक्त मतदारसंघांना या दोघांनीही मान्यता दिली होती!! ….

आणि

मध्यवर्ती कायदेमंडळात [ तत्कालीन लोकसभेत] मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देणारा `लखनौ करार' देखील टिळकांनीच केला होता.…

याविषयी कधी कोणी चकार शब्द काढत नाहीत.
वरून त्यांना धूर्त, मुत्सद्दी म्हटले जाते .

याउलट लखनौ कराराच्या पुढे जाणारा कोणताही करार ज्या गांधींनी केला नाही ,

ज्या गांधींनी अशा योजना फ़ेटाळण्यात आपले वजन खर्च केले म्हणून क्रमाक्रमाने मुस्लिम गट फुटून बाहेर पडला, त्या गांधीजींना मात्र `मुस्लिमधार्जिणा' ठरवले जाते यासारखा दुसरा राजकीय चिकित्सकपणाचा दिवाळखोरपणा असणार नाही.

- नरहर कुरुंदकर [`शिवरात्र' मधील `गोळवलकर गुरुजी व महात्मा गांधी']

Lokesh Shevade sir यांच्या वॉलवरुन साभार .

No comments:

Post a Comment