Blog Archive

Tuesday, 9 August 2016

चांगले विचार युवा व्याख्यानमाला पुष्प पाचवे- आरोग्य

चांगले विचार युवा व्याख्यानमाला
पुष्प पाचवे:

कालचे व्याख्यान खुप छान झाले... डॉ.गद्रेंनी ethical practice करताना त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले.
SSC मेरीट आल्यानंतर डॉ. होऊन खेड्यात सेवा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्षात दवाखाना सुरू केल्यानंतर आलेल्या अडचणी, तरीही आपण केलेल्या कामाचे मिळणारे समाधान पण त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकारामुळे, कट प्रॅक्टीस मुळे होत असलेली कुचंबणा आणि जीवावरच बेतलेल्या एका घटनेनंतर वैद्यकीय सेवा साेडण्याचा घेतलेला निर्णय...हे सगळे सविस्तर सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकाराला कारणीभूत असलेले घटक, त्यांचे असलेले हितसंबंध, लोकांचा बदलता दृष्टीकोन, त्यामुळे होणारी पेशंटची मानसिक व आर्थिक पिळवणुक यावर मांडणी करताना हे सगळे थांबवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनचळवळीची गरजही त्यांनी बोलुन दाखवली.
मध्यमवर्गीय लोकांचा तटस्थपणा, जागतिकीकरणामुळे आलेली सुबत्ता आणि त्यातून आपण कोणत्याही सेवा विकत घेऊ शकतो असा आलेला अहंभाव मग ती वैद्यकीय सेवा असो किंवा शिक्षण क्षेत्र. याबाबी मांडताना हे बदलण्यासाठी 'डॉक्टर-नागरीक' फोरमची गरजही बोलुन दाखवली.
या गैरप्रकारचा डॉक्टरांनावरही होणारा परिणाम सांगताना अजूनही हे सगळे बदलता येईल अशी आशा ही त्यांनी बोलुन दाखवली.
यासाठी ते 'साथी' या संस्थेच्या माध्यमातून करत असलेले प्रयत्नही त्यांनी सांगितले.

पाऊस असल्यामुळे प्रेक्षक जरी कमी असले तरी त्या तरुण वर्ग जास्त होता हे  डॉ. अरुण गद्रेंना आवडले.

No comments:

Post a Comment