कमाल आंबेडकरी जनतेची आहे. चुकीचे संदर्भ घेऊन गांधीजी दलित विरोधी होते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्यात कसा वाद होता. ते एकमेकाचे कसे विरोधक होते. हे गोबेल्स नितीशास्त्र नुसार पटवून देण्याचा आटापिटा करत आहेत. संघ परिवार पडद्याआड राहून दलिताना तसे बौद्धिक खाद्य पुरवत आहेत.
एकंदरीत हिंदू, मुस्लिम, अंबेडकरी जनता या सगळ्याचे सॉफ्ट टार्गेट म्हणजे मं. गांधी यात नथुराम चे उदात्तीकरण तर जोरदार चालू आहे.
दोन महापुरुषांची तुलना होऊच शकत नाही दोन्ही रेल्वेचे समांतर रुळ आहेत.
बीबीसी च्या बाबासाहेब यांच्या मुलाखती चा संदर्भ दिला जातो. त्यात बाबासाहेब यांनी म्हटले आहे की मी गांधीना *महात्मा* मानत नाही. यात काही खूप मोठी गोष्ट नाही दोन्ही कर्तुत्ववान व्यक्ती जर एकसमान पातळीवर आहेत तेव्हा बाबासाहेब नसतील मानत महात्मा त्यात काय एवढं.
सावरकर यांच्या बाबतीत अशीच एक गोष्ट सावरकर व प्रबोधनकार ठाकरे हे समकालीन. सावरकर (1883-1966 ) प्रबोधनकार के.सी.ठाकरे (1885-1974)
दोन्ही दादर येथे 100 मिटर अंतरावर रहात होते पण सावरकरांबद्दल ठाकरे यांनी फार त्रोटक लिहिले आहे तेदेखील सावरकराची हिंदूत्वाची सफाई करणारे आहे. मग काय नथुरामी प्रवृत्ती सावरकरांना कमी लेखेल काय ?
प्रबोधनकार आपल्याला समजून घ्यावे लागतील सावरकर विचार प्रचार करायला पंडित नथुराम चे नाटकी आवतार महर्षी शरद पोंक्षे आहेच
आपला शुभचिंतक कोण हितशत्रू कोण हे अंबेडकरी जनतेने समजून घ्यायला हवं. वर्षानुवर्ष आपल्या सावली चा देखिल विटाळ मानणारे आपला बुध्दीभ्रम करून. एका महात्मा बद्दल विखारी प्रचार करत असतील व त्याला आपण बळी जाणार असू तेव्हा जीत त्यांचीच होणार हे लक्षात घ्यायला हवे.
दिनेश मोरे- धुळे
खर बोललात..... गांधी आणि आम्बेडकर यांचे सुर जुळू नयेत म्हणून सुद्धा त्या काळात बराच जीवाचा आटापिटा केला असेल... नाहीतर आज दाखविल्या जातात तशी दोन टोकं राहीलीच नसते हे विचारवंत....
ReplyDelete