अहमदनगर येथील स्नेहालय प्रेरित 'अनामप्रेम' ही संस्था इयत्ता दहावी पास/नापास अंध व अल्पद्रुष्टी गरजू मुला-मुलींसाठी दोन महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करीत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या राहण्या-जेवण्याची मोफत व्यवस्था केली जाते. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थ्यांना जॉब प्लेसमेंटसाठी संस्थेकडून सर्व सहकार्य केले जाते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेशासाठी संस्थेच्या कार्यालयात उद्या दिनांक 31 मे 2017 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत, तरी आपल्या माहितीत कोणी गरजू अंध व अल्पद्रुष्टी विद्यार्थी असल्यास त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवावी. तसेच या कार्यासाठी कोणी कोणत्याही प्रकारची मदत करू इच्छित असल्यास संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. संस्थेमार्फत अंध विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 'प्रकाशवाटा' हे ऑडिओ व ब्रेल स्वरूपातील मासिक विनामूल्य पुरवले जाते. त्यासाठीही नोंदणी अवश्य करावी.
पत्ता:
अनामप्रेम भवन, गांधी मैदान, अहमदनगर
फोन: 0241-2320801, 9011020174, 9422220123
anamprem2012@gmail.com
www.anamprem.org
No comments:
Post a Comment