Blog Archive

Monday, 29 May 2017

हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट


सोमवार, ११ मार्च, २०१३


-महावीर सांगलीकर 

हिटलर आणि सावरकर यांची रत्नागिरी येथे गुप्त भेट झाली होती. सावरकर प्रेमी लोकांनाही माहीत नसलेल्या या भेटीचे पुरावे प्रसिद्ध फ्रेंच-रशियन शोध पत्रकार लई झूटोस्की  यांनी  शोधून काढले आहेत. या विषयावरील त्यांचा एक लेख  फ्रेंच भाषेतील एका प्रख्यात  नियतकालीकात प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांना या भेटीची सुरस कथा माहीत व्हावी यासाठी त्या फ्रेंच लेखाचा मराठी अनुवाद येथे देत आहे.

सावरकर माफी मागून अंदमान माधून सुटल्यावर त्यांना रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवण्यात आले.  तेथे असताना इंग्रजांना दिलेल्या वचनाला जागून ते स्वस्थ बसून राहिले. पण हा त्यांचा डाव होता. इंग्रजांना  चकवून त्यांनी जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्याशी गुप्त पत्रव्यवहार केला. एका महत्वाच्या पत्रात सावरकरांनी हिटलरला रत्नागिरीला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या आमंत्रणाला मान देवून हिटलर U-108 या पाणबुडीतून रत्नागिरीच्या किना-यावर अवतरला. सावरकरांनी आपल्या पत्रामधून केलेल्या सुचनेनुसार  हिटलरने चक्क आपली मिशी काढून टाकली होती, डोक्याचे मुंडण केले होते, शेंडी राखली होती आणि धोतर-पंचा नेसला होता. त्यामुळे तो चक्क एखादा कोकणस्थ ब्राम्हण वाटत होता.

त्याच्याबरोबर हिमलर, गोबेल्स, रोमेल वगैरे मंडळीही होती. त्यांनीही आपला वेश याच प्रकारचा केला होता. त्यामुळे सावरकरांच्या घरावरती नजर ठेवून असणा-या पोलिसांना कसलाही संशय आला नाही. नेहमी कार्यकर्ते भेटायला येतात तसे हे कोणी तरी असावेत असे पोलिसांना वाटले.

सावरकर आणि या जर्मन मंडळीची एका बंद खोलीत गुप्त मीटिंग झाली. त्यावेळी सावरकर यांनी जर्मनांना सांगितले की तुम्ही आणि आम्ही आर्यवंशीय आहोत, त्यामुळे आपण एकमेकाचे भाऊ-भाऊ आहोत.

या मीटिंगमध्ये सावरकरांनी वेदातील अणुबॉम्बचे तंत्रज्ञान हिटलरला भेट म्हणून दिले. एका अणुचा वैदिक पद्धतीने प्रत्यक्ष  स्फोटही करून दाखवला. तसेच मिसाइलचे तंत्रज्ञानही उलगडून सांगितले. सावरकरांनी  अंगणात येवून हिटलरच्या समक्ष आकाशात एक बाण सोडला, तो पुढे हिटलर जर्मनीला परत गेल्यावर त्याला त्याच्या अंगणात पडलेला दिसला.


सावरकरांनी दिलेल्या तंत्रज्ञानाचा हिटलरला मोठा उपयोग होणार होता. त्यामुळे खूष होवून त्याने सावरकरांना आपले स्वत:चे पिस्तूल भेट दिले. (पुढे हेच पिस्तूल सावरकरांनी नथुरामाला  भेट दिले असा प्रवाद आहे).

हिटलरने सावरकरांना आपल्या बरोबर जर्मनीला यायची विनंती केली. पण सावरकरांनी या गोष्टीस नकार दिला. मी रत्नागिरीत राहूनच देशकार्य करणार आहे असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले.

या जर्मन मंडळींना मराठी येत नसल्याने आणि सावरकरांना जर्मन भाषा येत नसल्याने, संपूर्ण  संभाषण संस्कृत भाषेत झाले.

ही भेट  दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर कांही आठवड्यातच  झाली.  ही भेट इतकी गुप्त होती की सावरकरांच्या एकाही साथीदाराला या भेटीची माहिती नव्हती, आणि नंतरही देण्यात आली नाही. सावरकरांनीही  आपल्या  कोणत्याच पुस्तकात आणि भाषणात या भेटीचा उल्लेख केलेला नाही.

 लई झूटोस्की यांनी हा दावा दुसरे महायुद्ध संपल्यावर रशियन सैनिकांनी जर्मनीची जी कागदपत्रे जप्त केली, त्यांचा अभ्यास करून केला आहे

No comments:

Post a Comment