गोमुत्राने कर्करोग बरा झालेला एक तरी रुग्ण भारतात सापडेल का ? तसेच दमा , हृदयरोग , मधुमेह , किडनीसारख्या असाध्य रोगांवर गोमुत्र उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवणारा कोणी नशीबवान गायाळ गोभक्त आहे का ?
गुगलवर गुमूत्राच्या बहुगुणी मात्रेसंबंधी अनेक फेक गोष्टी प्रसिद्ध होत असतात. अंधभक्तांनी हे लक्षात ठेवावे की, नवीन शोध स्वीकारण्याची एक प्रक्रिया असते. त्यातून तावून सुलाखून जे टिकते तोच शोध शास्त्रीय जगात मान्य होतो. म्हणून गोमूत्राच्या बाबतीतील माहिती कोणत्या शास्त्रीय मासिकात हे प्रसिद्ध झाली आहे ते महत्वाचे ठरते. अन्यथा ते नुसते भावना उद्दीपित करून अस्मिता गोंजारणारे टाकावूच ठरते.
जसे अनेक हिंदुत्ववादी शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये पुष्पक विमानाच्या अस्तित्वाचे समर्थन करण्याचा मूर्खपणा करतात, त्याचप्रमाणे गोमूत्राने कर्करोग, हृदरोग असे अनेक रोग बरे होतात म्हणणे हे त्यातीलच एक उदाहरण म्हणता येईल. म्हणून त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर स्वीकारले न जाता फक्त भारतापूरतेच मर्यादित राहाते. जर खरेच गोमूत्र एवढे बहुगुणी असेल ह्या संशोधनाला जगन्मान्यता का मिळत नाही ? आणि असे लाखो रुग्ण आहेत की ज्यांच्यावर हा उपचार चालू असता इतर उपचार चालू ठेवायची परवानगी त्यांना देण्यात येते. ते कशासाठी ? तेव्हा आता भावनेचा उन्माद बंद करून बुद्धीचा वापर करायला हे अंधभक्त केव्हा शिकणार ? बहुदा नाहीच. कारण त्यांचा मेंदू धर्मअंधतेत गहाण जो पडलाय.
No comments:
Post a Comment