Blog Archive

Monday, 29 May 2017

दो लब्जोंकी कहानी- गजानन घोंगडे

शब्दांच्या बाबतीत म्हणतात ‘शब्द बापुडे केवळ वारा’ मात्र हेच शब्द जेव्हा सारस्वतांच्या लेखणीतून येतात तेव्हा जगण्यासाठी आवश्यक असा ऑक्सीजन घेऊन येतात. कॉलेजला असताना चुनौती नावाची एक दूरदर्शन मालिका होती ती मालिका आठवत नाही त्याचं शिर्षकगीत मात्र पक्कं लक्षात आहे. जेव्हा-जेव्हा तणाव येतो, काय करावं कळत नाही तेव्हा ते शिर्षक गीत मनातल्या मनात वाजायला लागतं ‘मन एक सिपी है, आशा मोती है, हरपल जीवन का एक चुनौती है । सोने न दे आग सीने की, कर ले लगन से तू प्यार ,आवाज़ देकर बुलाले तू, तेरे लिए है बहार, जो बन जाता है धूल राहो में, उसकी दीवानी मंजिल होती है...लगोलग आठवतात हरिवंशराय बच्चन. अमिताभ बच्चननी एकदा वडीलांना विचारलं ‘बाबूजी, जीवन में संघर्ष कब तक करना पडेगा’ त्यावर बाबूजींचं उत्तर होतं ‘जब तक जीवन है संघर्ष तो रहेगा ही’! कलाकार म्हणून काम करतांना, अनेकदा मनस्ताप, निराशा यायची तेव्हाही एका मालिकेच्याच शिर्षकगीताने हात दिला त्या ओळी होत्या, कभी हादसोकी डगर मिले, कभी मुश्किलो का सफर मिले, ये चिराग है मेरी राह के मुझे मंजिलो की तलाश है...! ज्यांनी बर्‍यापैकी हिंदी गाणी ऐकलीत त्यांना वेगवेगळ्या मोटीवेशनल लेक्चर्सची गरज पडली नाही. वेगवेगळ्या कवींनी, शायरांनी वेळोवेळी ते काम इमानेइतबारे केलंय. कधी ते सांगतात, ‘मन ही देवता, मन ही ईश्‍वर, मन से बडा न कोय, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय, इस उजले दर्पण पर प्राणी धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाये, भले, बुरे सारे कर्मो को देखे और दिखाए, तोरा मन दर्पन कहलाए’. जगणं उलगडणार्‍या संत साहित्यानंतर जगणं सहज करण्याचं काम साहीर साहेबांसारख्या गीतकारांनी केलंय. इतक्या वर्षात काय केलंय किंवा काय कमावलं असं कोणी विचारलं की उत्तर द्यावसं वाटतं, ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया, जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया...’. उगाच जगण्याला किचकट बनवण्यापेक्षा, ‘जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी ये हसाये कभी ये रुलाये’ हे ऐकून स्वतःला समजून घ्यावं आणि आयुष्याला सांगावं, ‘जिंदगी, जिंदगी, जिंदगी कब तुमको देखा है, कब तुमको जाना है, तारों के संग जिवन के रंग में तुमको पाना है, अपने घर लाना है, ये मैंने ठाना है’. पुष्कळदा वाटतं ज्याप्रमाणे वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी औषधं आहेत त्याप्रमाणे प्रत्येक मनःस्थितीचा विचार करुन कवींनी ही गाणी लिहीली आहे. पराभूत झालेल्यांना ते सांगतात, ‘रुक जाना नही, तू कही हारके, काटोंपे चलके मिलेंगे साये बहार के’ तर कधी ते रडणार्‍यांना सांगतात, ‘पोंछकर अश्क अपनी आँखोसे मुस्कुराओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो काई बात बने’. कायम भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात जगण्यार्‍यांना ते सांगतात, ‘आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही इक पल है’. तेवढ्यासाठी ‘पावर ऑफ नाऊ’ सारखं टप्पारं पुस्तक वाचायची गरज उरत नाही ! एखादं अपयश, एखादी चूक यांनी स्वतःला मिटवून जगण्याऐवजी ते सांगतात, ‘न मुँह छुपाके जीओ और न सर झुकाके जीयो, गमोंका दौर भी आये तो मुस्कुराके जीओ’. हाच धागा पुढे नेत एक गाणं तुम्हाला भेटतं, ‘जिंदगी हसने गाने के लिए है पल, दो पल, इसे खोना नही, खोके रोना नही, जिंदगी हसने गाने के लिए है पल दो पल...’. कधी तुम्हाला ते समजवतात, ‘जिंदगी की यही रीत है, हारके बाद ही जीत है, थोडे आँसू है, थोडी हसी, आज गम है तो कल है खुशी’. तर कधी मुकद्दर का सिकंदर बनण्याचा सोपा फॉर्म्यूला सांगतात, ‘रोते हुए आते है सब, हसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलाएगा’. कुठे रेल्वेसारख्या रुपकांचा आधार घेऊन सांगतात, ‘गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है...’. कधी जगण्याचा अर्थ शोधण्यापेक्षा, जगण्याला त्रास समजून घेण्यापेक्षा, सहजपणे ते जगण्याला म्हणतात, ‘ऐ जिंदगी गले लगा ले, मैंने भी तेरे हर गमको गलेसे लगाया है, है ना’. आयुष्याला समजून घेण्यासाठी, सोपं करून त्याच्यासोबत चालण्यासाठी, यापेक्षा सुंदर कुठल्या ओळी असतील? या सगळ्या ओळी ऐकल्या की मग बाहू पसरवून प्रत्येक क्षणाचं स्वागत करायला तयार झालेलं मन गुणगुणायला लागतं, ‘लिये सपने निगाहों में चला हॅूं तरी राहों में जिंदगी आ रहा हूँ मैं’....
गजानन घोंगडे

No comments:

Post a Comment