Blog Archive

Sunday, 21 May 2017

गांधींजीना राष्ट्रपिता म्हणण्यासंबंधीची RTI

ही 2012 ची RTI आहे..आजही ती facebook वर फिरताना दिसते ..हिंदूत्ववादी, ओवेसी सारखे मुस्लिम धर्मांद व संविधान संविधान म्हणत संविधान डोक्यात न घेता डोक्यावर घेणारे यांच्यात ह्या RTI बाबत  एकमत आढळते(धन्यवाद बापू :D) ..वास्तविक संविधानाची थोडीही माहिती असणार्याला या RTI बद्द्ल काही विशेष वाटणार नाही..कारण संविधानातीलच Article 18 (Abolition of titles except military and academic ) नुसार संविधानाने भेदभाव टाळण्यासाठी उपाधी देण्यावर प्रतिबंध घातलेला आहे  ..article 18 prohibits the state from conferring any title (except a military or academic distinction ) on any body ,whether citizen or foreigner ...त्यामुळे संविधानाच्या भाषेत राष्ट्रपिता,घटनेचे शिल्पकार,स्वातंत्र्यवीर ,महात्मा,पंडीत ह्या अशा कित्येक उपाधी निर्रथक आहेत ...यातील कोणत्याही उपाधी बाबत RTI टाकले तरी हेच सेम उत्तर येईल जे गांधीजींच्या RTI बाबत आलेय..पण इतर महापुरुषांच्या बाबतीत अशी RTI कोणी टाकणार ही नाही ,कारण प्रत्येकाच्या मागे कोणतीतरी जात ,धर्म व प्रांतीय अस्मि�ता उभीये आणि हेच वास्तव आहे..गांधीजींना 'राष्ट्रपिता ' म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधले होते..ही आझाद हिंद सेना सरकार ने दिलेली उपाधी होती ..पण गांधीद्वेषापुढे काही दिसेल तर ना..वास्तवात महापुरुषांना दिलेल्या उपाधींमध्ये लोकभावना,लोकांचे महापुरूषांवरील प्रेम असते..महात्मा फुलेंना महात्मा उपाधी देण्यासाठी कोणा ब्रिटिश सरकारची वा संविधानाची संमती नव्हती ,लोकांचे त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतिक होते..बार्डोलीच्या स्त्रियांनी वल्लभभाई पटेलांना दिलेली 'सरदार' पदवी कोणा सरकार किंवा संविधानाच्या सम्मतीने दिली नव्हती..अब्दुल गफार खानांना याच लोकभावनेतून 'सरहद्द गांधी ' संबोधीले जाते....हीच गोष्ट महात्मा गांधी,नेताजी बोस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मौलाना आझाद अशा कित्येक महापुरुषांना असलेल्या उपाधी बाबत लागू पडते ..पण गांधीद्वेषाची लागण झालेले लक्षात काय घेणार....गांधीजींना कोणी काय संबोधावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार ...बाकी कोणी त्या फकीराला 'राष्ट्रपिता' म्हणा वा 'टकल्या' म्हणा ,'एकला चलो रे ' म्हणत जिवनाच्या शेवटपर्यंत तो मानवतेसाठी झटत राहीलाय व आजही तो झटत राहतोय...कधी मार्टीन ल्युथर किंग ने उभारलेल्या कृष्णवर्णियांच्या चळवळीमधून..कधी दूरदूर्गम भागात कूष्टरोग्यांच्या ,आदिवासींच्या बाबा आमटेंच्या सेवाकार्यातून..कधी द.अफ्रिकेच्या नेल्सन मंडेलांच्या लढ्यातून ..तर कधी हुकुमशाही उलथून टाकणार्या जयप्रकाश नारायण यांच्या आणिबाणी विरूद्ध लढ्यातुन ...!!
अजिंक्य गायकवाड

No comments:

Post a Comment