Blog Archive

Monday, 29 May 2017

सावरकर- संकेत मुनोत साम टीव्ही वरील कार्यक्रम

आज सावरकर जयंती
*त्यांची साहित्यसंपदा, कवित्व,(विज्ञानवादी निबंध) अंदमानपूर्वीचे कार्य आणि अंदमानात भोगलेला कारावास याला माझे विनम्र अभिवादन आणि नमन*
पण ही बाजूही मांडावीच लागेल
लहानपणी सावरकरांचा प्रचंड चाहता होतो, मला भडक व ज्वलंत पुस्तके खुप आवडत म्हणजे ती लगेच ऊपलब्धही असत, नथुराम , हिटलर व तत्सम लोकांची द्वेषपुर्ण पुस्तके हातात पडली होती जी एकदम भारी वाटत पण सर्व बाजु वाचल्यानंतर व अभ्यासानंतर ती #अतिरंजित_व_खोटी आहेत हे समजले.
आज #भडकनार्याची गरज नाही तर #पेटणार्याची गरज आहे.
भडकण्याने अन्न जळते किंवा करपते तरी ,
परंतु पेटण्याने ते शिजते.
भडकनारे निखळनार्या तार्या प्रमाणे चमकतात आणि खाक होतात पेटणारे चंद्रा प्रमाणे सतत प्रकाश देत निखळुन न जाता अचल राहतात. तुम्ही ठरवा तुम्हला भडकायचे की पेटायचे ?
भरतकुमार राऊत सरांनी वृत्तपत्रात आणि रमेश पतंगे सरांनी साम टीव्ही वरील live चर्चेत सावरकरांच्या माफिनाम्याची तुलना जेव्हा शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली तेव्हा त्याला प्रतिक्रिया दिली होती ती अशी
*सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. आग्र्याहुन सुटुन आल्यावर शिवाजी महाराज काय शांत बसले नव्हते त्यांनी त्यानंतरही अनेक लढाया लढल्या आणि गड जिंकले होते ते शेवटपर्यंत रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी लढत होते*
*याऊलट अंदमानला जाण्यापुर्वी सावरकर थोडे विज्ञानवादी सुधारणावादी असले तरी*
*ब्रिटीशांची माफी मागुन सुटुन आल्यावर भारतात आल्यावर त्यांनी कुठल्याही सशस्त्र वा अहिंसक स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही.धार्मिक तेढ निर्माण करणारे, माणसा माणसात जातपात धर्म प्रांत यावरुन भांडण लावणारे, द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडुन भारत पाकिस्तान फाळणीची बीजे पेरणारे, गांधीहत्येचा कट रचणारे , देशातील गोरगरीबांचे शोषण करणार्या संस्थानिकांना साथ देणारे, देशाच्या एकीकरणााला आणि संस्थानांच्यस विलिनीकरणात अडथळे निर्माण करणारे होतेे,*
*काही लोक सावरकर शिवाजी महाराजांना आदर्श मानत होते असे म्हणतात* पण शिवाजी महाराजांच्या सर्व धर्मांना आदर करण्याच्या व *स्त्रीयांचा आदर करण्याच्या चांगल्या गुणांना सावरकरांनी  *विकृती*( सद्गुण विकृती )म्हटले आहे. सावरकरांनी आपल्या सहा सोनेरी पाने पुस्तकात खालील शब्द लिहले आहे.
“कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ” एवढच शिवाजी महाराजांबद्दल मी बोलू शकतो. ज्यांनी मनुस्मृती लिहीली त्यांच्याबद्दल पन्नास पाने आणि शिवाजी महाराजांबद्दल दिड पाने ही सहा सोनेरी पाने ह्या पुस्तकात वाचायला मिळतात.
प्रेयसीवर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणायचं असेल तर सावरकरांच्या आदेशाप्रमाणे गांधीजीचा खुन करणाऱ्या नथुरामलाही देशभक्त म्हणता येईल.
कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .
*कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.*
*सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते*
*बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते ....... खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते त्या वेळी हे फक्त हातात काठ्या घेवुन पाडव्याचे संचलन करत होते*
*लोकांना देवा धर्मावरुन जातीपातीवरुन भडकवत होते*
*तेव्हा संघटना म्हणून हिंदू महासभा(सावरकर), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या  या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?*
अधिक माहितीसाठी साम टीव्ही वरील कार्यक्रमाची लिंक- https://youtu.be/6L2pDzO-6wA
संवाद कोशल्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे काही चुकले असल्यास अवश्य सांगावे
संकेत मुनोत

No comments:

Post a Comment