Blog Archive

Wednesday, 31 May 2017

माणसांनी माणसांना.....(^m^) (^j^) (मनोगते)

गुरासारखे ओढायचे ,गाढवासारखे राबवायचे ,
जळूसारखे शोषायाचे,लांडग्यांसारखे चावायचे ,
कशासाठी ?............पोटासाठी !.........

माणसांनी माणसांना .......
कुत्र्यासारखे चाटायचे ,मांजरासारखे गोंजारायचे ,मोरासारखे रिझवायचे,
पक्ष्यासारखे पाळायचे ,
कशासाठी ?.........पोटासाठी !.........

माणसांनी माणसांना .........
माकडासारखे नाचवायचे ,उंदरासारखे खेळवायचे ,सापासारखे डसायचे ,पशू सारखे भोगायचे ,
कशासाठी ?........पोटासाठी !...........

माणसांनी माणसांना ...........
शेळ्या मेंढ्या सारखे विकायचे,किड्या मुंग्यांसारखे मारायचे ,
कशासाठी ?...........पोटासाठी !........

पोटासाठी ......पशू सारखे वागायचे .....
पशू सारखे वागवायचे .....मग
माणसांना " माणूस " कशासाठी म्हणायचे ?

No comments:

Post a Comment