Blog Archive

Tuesday, 30 May 2017

सावरकरांना प्रणामही आणि त्यांचा धिक्कारही

सावरकर....

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली....या ओळी लिहायला सुध्दा आधी कुसुमाची कोमलता काळजात असायला हवी ! सावरकरांच्या या कोमल कवी ह्रदयाला प्रणाम्...

जातीउच्छेद करण्या साठी झटणाय्रा...पतीतांना पावन करण्यासाठी झटणाय्रा रत्नागिरीच्या विनायकाला प्रणाम...

सत्तावन्नच्या लढ्याला स्वातंत्र्याचे समर म्हणुन गौरवणाय्रा...मुघल सल्तनतीच्या मावळत्या सुर्यांला बाहदुरशहाला हिंदुस्तानचा बादशहा मानणाय्रा...प्रखर राष्ट्रभक्ताला प्रणाम्....

स्वराज्य नाही स्वदेश नाही धिक् या देहाला
चला घालू स्वातंत्र्य संघरी रिपुवरी घाला |....
...रिपुवर घाला घालून अंदमानातल्या हाल अपेष्टातही काव्याचे मनोरे रचणाय्रा देशभक्त कवी सावरकरांना प्रणाम्....

वरिल सावरकर मान्य....मात्र....

रिपुवर घाला घालून अंदमानात तेलाचे घाणे चालवून नंतर मनसोक्त माफीनामे लिहून सुखरूप पारतंत्र्यात असणाय्रा स्वदेशात आलेले...

स्वातंत्रासाठी झटणाय्रां देशभक्तांच्या आडवे पडून, क्रांतीकारकांचे पत्ते इंग्रजांना देणारे आगळे वेगळे "स्वातंत्र्यवीर"...

"हिंदुत्व" या शब्दाला जन्म देवून हिंदूंना विखारी राजकिय तत्वज्ञान देवून, द्विराष्ट्रवादाची नौबत वाजवून हिंदू मुसलमानांच्या एक्यात खिंडार पाडणाय्रा....

शिवछत्रपतींना काकतीय न्याय लावून त्यांच्या स्त्रीदाक्षीण्याला कमजोरी मानणारे, संभाजी राजांना वाया गेलेला राजपुत्र मानून हेटाळणी करणारे ब्राम्हणी विचारधारेचे वाहक....

धर्मांतरानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा "बाटगा" म्हणून उल्लेख करनारे आणि बौध्द धम्माला भारतीय पारतंत्र्याचे कारण ठरवणारे सोईचे इतिहासकार...

आणि...

गांधीजींचा वैचारीक पराभव न करता आल्याने त्यांच्या विरूध्द कट रचून नथुराम नावाचा प्यादा वापरून गांधीजींच्या देहाला संपवणारे बॅ. विनायक दामोदर सावरकर अमान्य....त्रिवार अमान्य...!!!!!! त्यांच्या अश्या सर्व अनुचीत कर्मांचा धिक्कार...!!!!

- अभिजीत घाडगे

No comments:

Post a Comment