माझा पगार होतो..
तेव्हा,माझी पत्नी
तिच्या सुंदर हस्ताक्षरात
लिहते किराणा मालाची यादी....
हीच यादी माझ्यासाठी
जगातील एक सुंदर कविता असते...........
आणि या कवितेची खरी समीक्षा फक्त तो दुकानदार करतो,
तो एक एक शब्द खोडत जातो,
पुढे आकडा वाढत जातो,
आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो...
त्याच्या लाल वहीत असतं
माझ्या नावाचं एक पान....
किती जमा किती शिल्लक
एकच आकडा उरतो..
बाकी शून्य होत नाही कधीच...
जीव तळमळतो
फक्त एवढ्यासाठी की,
त्याला सांगावंसं वाटतं प्रत्येकवेळी बाबारे
माझं नाव लिहताना
पुढे कवी म्हणून लिहीत जा...
कधी बोलता आलं नाही,
तो व्यापारी आहे
त्याला व्यवहार कळतो...
हिशोब पूर्ण झाला की,
हातातलं पेन कानावर ठेवून
एवढंच म्हणतो,
यावेळी ठीक आहे राव
पण पुढच्यावेळी मी ऐकून
घेणार नाही....
पुन्हा उधार देणार नाही..
पिशवीभरून कविता
सांभाळून आणताना
भूक कवितेशी बोलू लागते
आणि मी जगाला जगण्याचं तत्वज्ञान सांगू पाहतो....
आशावादी का काय म्हणतात ते...
माझीच बाकी शून्य होत नाही...
आशावादी शब्दांनो कधीतरी
त्या लाल वहीत जा..
माझ्या पानावर थांबा थोडावेळ..
आणि सांगा त्या आकड्यांना
बाकी शून्य येण्याचं एखादं सूत्र...
आणि हसू द्या तिच्या गळ्यातलं
एकदातरी मंगळसूत्र....
------------
दंगलकार नितीन चंदनशिवे..
कवठेमहांकाळ
सांगली.
सध्या पुणे.
8855800195
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Blog Archive
-
▼
2017
(121)
-
▼
May
(47)
- तुम्ही फक्त हिन्दू धर्मावरच टिका करता, हिम्मत असेल...
- बोलो, जय गोमुत्र... जय गोबर... :- जेट जगदीश. (^j^)
- गांधीजी अस्पृश्यता निवारणाबद्दल किती क्रांतिकरक वि...
- धर्म,अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही.- पु.ल.देशपांडे
- किन्नर ( तृतीयपंथी )- समीर गायकवाड
- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या खूनाला ६८ वर्ष लोट...
- माणसांनी माणसांना.....(^m^) (^j^) (मनोगते)
- *काय आहे समाजकार्य ?* Social work
- भगवान छत्रपती शिवाजी महाराज हा काय प्रकार आहे ?दत्...
- सावरकरांना प्रणामही आणि त्यांचा धिक्कारही
- अल्पद्रुष्टी गरजू मुला-मुलींसाठी दोन महिन्यांचे व्...
- भ्रमजालातून वास्तवाकडे अनेका आत्मपरीक्षणाकडे नेण...
- *'लहरी' विज्ञानाची समीक्षा !* मकरंद देसाई*
- माहेर- गदिमा
- उतनी दूर मत ब्याहना बाबा ! - निर्मला पुतुल
- माझा पगार होतो.. तेव्हा,माझी पत्नी-दंगलकार नितीन च...
- नव्या जागतिक व्यवस्थेबद्दल, भारतातील दूरसंचार क्रा...
- सिझेरियन आणि नॉर्मल- डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, (अधिक...
- जाता जाता शेवटचे शब्द. --------------दंगलकार.-------
- झुकायला सांगितले, ते सरपटताहेत- अमेय तिरोडकर
- एक हमारी और एक उनकी मुल्क में हैं आवाजें दो-जावेद ...
- दो लब्जोंकी कहानी- गजानन घोंगडे
- मुस्लिमांना विभक्त मतदार संघ टिळकांनी दिले पण बदना...
- कायम शेतकरी , शेतकरी आत्महत्येवर बोलताना ते आता बं...
- "ना खाया, ना पिया…गिलास तोडा उसका बाराना" - संजय पवार
- सुकमा ते सहारनपूर-प्रतिमा जोशी
- हा कार्यकर्ता म्हणजे आपले संतोषभाऊ अरसोड
- भिंतीला खिंडार पाडायलाच हवं-Tanmay Kanitkar
- पुलोपदेश डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आड...
- माझा विरोधक माझ्याशी चांगला वागत नाही.त्याचाच आदर्...
- “मैं हिंदुओं और मुसलमानों को बर्दाश्त कर सकता हूं,...
- कसला मोदी उत्सव करता राव-शामसुंदर सोन्नर
- ना मस्जिद की बात हो,न शिवालों की बात हो
- मी-एक नापास आजोबा-पु.ल. देशपांडे
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘संस्कारभारती’ ...
- सावरकर- संकेत मुनोत साम टीव्ही वरील कार्यक्रम
- स्किझोफ्रेनिक भारतीय समाज
- पायथागोरस हा हिंदूच
- हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट
- कौन है भारत माता ? क्या है भारत माता ?
- गांधीजीके बारेमे सच और मिथक
- संस्कृती(मुख्यमंत्री अपघात विशेष)-राज कुलकर्णी
- OFFICIAL TITLE
- गांधींजीना राष्ट्रपिता म्हणण्यासंबंधीची RTI
- गर्भ आशय(विज्ञान,कल्पना आणि वास्तव यांचा अप्रतिम म...
- संघ परिवार पडद्याआड राहून दलिताना तसे बौद्धिक खाद्...
- अपेक्षा नव्हती एवढा प्रतिसाद मिळेल म्हणून पण अपेक्...
-
▼
May
(47)
Monday, 29 May 2017
माझा पगार होतो.. तेव्हा,माझी पत्नी-दंगलकार नितीन चंदनशिवे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
Good sir. Nice Realistic Feelings
ReplyDeleteVery Good,Sir
ReplyDeleteबहोत खूब
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteKhul Chan
ReplyDelete